India vs South Africa, 2nd T20I Live Updates : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) त्याच्या फेव्हरिट ग्राऊंड्सपैकी एक असलेल्या गुवाहाटी येथे उतरला आहे. त्याचा हा ४०० वा ट्वेंटी-२० सामना आहे आणि हा पराक्रम करणारा तो पहिलाच भारतीय ठरलाय... लोकेश राहुल व रोहित यांनी भारताच्या डावाची सकारात्मक सुरुवात केली. लोकेशने पहिलाच चेंडू चौकार खेचला, तर रोहितने दुसऱ्या षटकात स्कूप मारून चौकार कमावला. रोहितचा स्कूपचा प्रयत्न फसला, परंतु चेंडू ग्लोव्हजला लागून सीमापार गेला. रोहितचा हा चौकार ऐतिहासिक ठरला.
भारत-दक्षिण आफ्रिका याच्यांतला दुसरा ट्वेंटी-२० सामना आज गुवाहाटीच्या बसपरा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारताला घरच्या मैदानावर एकदाही आफ्रिकेविरुद्ध ट्वेंटी-२० मालिका जिंकता आलेली नाही. पण, रोहित शर्मा अँड टीमला आजची लढत जिंकून इतिहास घडवण्याची संधी आहे. पहिल्या ट्वेंटी-२० त भारताने सहज विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये काहीच बदल केलेला नाही. आफ्रिकेच्या संघात तब्रेझ शम्सीच्या जागी लुंगी एनगिडी मैदानावर उतरणार आहे.
रोहित शर्माचा आजचा ४०० वा ट्वेंटी-२० सामना आहे आणि एवढे ट्वेंटी-२० सामने खेळणारा तो पहिला भारतीय आहे. रोहितने मुंबई इंडियन्सकडून १९१, भारताकडून १४१, डेक्कन चार्जर्सकडून ४७, मुंबईकडून १७ आणि इंडियन्सकडून २ व इंडिया ए कडून २ सामने खेळले आहेत. ख्रिस गेल ( ४६३), किरॉन पोलार्ड ( ६१४), शोएब मलिक ( ४८१), रवी बोपारा ( ४२९) , आंद्रे रसेल ( ४२८) आदी खेळाडूंनी ४००+ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. भारताकडून रोहितनंतर दिनेश कार्तिक ( ३६८), महेंद्रसिंग धोनी ( ३६१), विराट कोहली ( ३५४) व सुरेश रैना ( ३३६) यांचा क्रमांक येतो.
रोहितने आज चौकार मारून ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये कॅलेंडर वर्षात ५०० धावा करणाऱ्या पहिल्या भारतीय कर्णधाराचा मान पटकावला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बाबर आजम ( ९३९ धावा, २०२१) याच्यानंतर आता रोहितचाच क्रमांक येतो. भारतीय कर्णधारांमध्ये विराट कोहलीने २०१९मध्ये ४६६ धावा केल्या होत्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IND vs SA, 2nd T20I Live Updates : Rohit Sharma becomes the first Indian captain to complete 500 runs in a calender year
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.