IND vs SA 2nd T20I Live Updates : नाणेफेकीचा कौल पुन्हा दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने लागला, बघा टीम इंडियाने Playing XI मध्ये काय बदल केला

India vs South Africa 2nd T20I Live Updates :  दिल्लीतील सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय संघ पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 06:34 PM2022-06-12T18:34:46+5:302022-06-12T18:43:46+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA 2nd T20I Live Updates : South Africa won the toss and decided to bowl first, know both team playing XI | IND vs SA 2nd T20I Live Updates : नाणेफेकीचा कौल पुन्हा दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने लागला, बघा टीम इंडियाने Playing XI मध्ये काय बदल केला

IND vs SA 2nd T20I Live Updates : नाणेफेकीचा कौल पुन्हा दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने लागला, बघा टीम इंडियाने Playing XI मध्ये काय बदल केला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs South Africa 2nd T20I Live Updates :  दिल्लीतील सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय संघ पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आज कटक येथे दुसरी ट्वेंटी-२० लढत खेळणार आहे. २१२ धावांचे लक्ष्य यशस्वीपणे पार करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचे मनोबल चांगले उंचावले आहे आणि ते पाच सामन्यांच्या मालिकेतील आघाडी आणखी भक्कम करण्याच्या  तयारीत आहेत. पहिल्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी सपाटून मार खाल्ला होता, त्यात श्रेयस अय्यरकडून सुटलेला झेल महागात पडला होता. या चूका सुधारून भारताला मालिकेत बरोबरीसाठी खेळावे लागेल.

भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल  व आवेश खान या तीन जलदगती गोलंदाजांसह टीम इंडिया पहिल्या सामन्यात उतरली होती. त्यांच्या जोडीला अक्षर पटेल व युजवेंद्र चहल हे फिरकीपटू होते. पण, चहलला केवळ दोन षटकं दिल्याने माजी खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली होती. हर्षल पटेलच्या हाताची दुखापत डोकं वर काढताना दिसली आणि त्यामुळे आज उम्रान मलिकला संधी मिळेल का, याची उत्सुकता लागली होती. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा याने नाणेफेक जिंकून पुन्हा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय  घेतला.


क्विंटन डी कॉकला हाताच्या दुखापतीमुळे आजच्या सामन्यात खेळता येणार नाही, तर त्रिस्तान स्टुब्ब्सलाही आज बाकावर बसवण्यात आले आहे. त्यांच्या जागी रिझा हेड्रीक्स व हेनरीच क्लासेन हे आफ्रिकेच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार आहेत. भारतीय संघात मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. उम्रान मलिकचे पदार्पण पुन्हा लांबणीवर पडले आहे.  

भारत - ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल ( India: 1 Ruturaj Gaikwad, 2 Ishan Kishan, 3 Shreyas Iyer, 4 Rishabh Pant (capt & wk), 5 Hardik Pandya, 6 Dinesh Karthik, 7 Axar Patel, 8 Harshal Patel, 9 Avesh Khan, 10 Bhuvneshwar Kumar, 11 Yuzvendra Chahal.)

दक्षिण आफ्रिका - रिझा हेड्रीक्स, टेम्बा बवुमा, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, डेव्हिड मिलर, हेनरीच क्लासेन, ड्वेन प्रेटोरियस, वेन पार्नेल, कागिसो रबाडा, केशव महाराज,   एनरिच नॉर्खिया, तब्रेझ शम्सी ( South Africa: 1 Reeza Hendricks, 2 Temba Bavuma (capt), 3 Rassie van der Dussen, 4 David Miller, 5 Heinrich Klaasen (wk), 6 Dwaine Pretorius, 7 Wayne Parnell, 8 Kagiso Rabada, 9 Keshav Maharaj, 10 Anrich Nortje, 11 Tabraiz Shamsi.)

Web Title: IND vs SA 2nd T20I Live Updates : South Africa won the toss and decided to bowl first, know both team playing XI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.