India vs South Africa, 2nd T20I Live Updates : रोहित शर्मा व लोकेश राहुल यांच्या ९६ धावांच्या सलामीनंतर सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) व विराट कोहली यांनी १०२ धावा जोडल्या. सूर्याने तर अक्षरशः कहर करताना आफ्रिकन खेळाडूंना रडकुंडीला आणले. लोकेश व सूर्याच्या अर्धशतकांनंतर चाहत्यांना विराट कोहलीच्या ( Virat Kohli) अर्धशतकाची प्रतिक्षा होती. त्याने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ११ हजार धावा करणाऱ्या पहिल्या भारतीय फलंदाजाचा विक्रम नावावर केला. १९व्या षटकात तो ४९ धावांवर नाबाद होता, अखेरच्या षटकात दिनेश कार्तिक स्ट्राईकवर होता अन् त्याने विराटला एक धाव काढून स्ट्राईक देतो असेही म्हटले, पण...
ट्वेंटी-२०त सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
- ख्रिस गेल - १४५६२
- किरॉन पोलार्ड - ११९१५
- शोएब मलिक - ११९०२
- विराट कोहली - ११०००*
दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात लोकेश राहुल व रोहित शर्मा ( Rohit Sharma) या जोडीने ९६ धावांची भागीदारी करून भारताला चांगली सुरुवात करून दिली. रोहितने मारलेले उत्तुंग फटके आणि लोकेशची तंत्रशुद्ध फलंदाजी चाहत्यांना खिळवणारी ठरली. रोहित ३७ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ४३ धावांवर बाद झाला अन् लोकेशने २८ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ५७ धावा चोपल्या. फॉर्मात असलेल्या सूर्यकुमार यादवने आफ्रिकेच्या गोलंदाजांना कुटून काढले. त्याने कागिसो रबाडाच्या एका षटकात २२ धावा चोपल्या आणि ट्वेंटी-२०त १००० धावा पूर्ण केल्या. सूर्याने ५७३ चेंडूंत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त १००० + धावा करताना ग्लेन मॅक्सवेलचा ( ६०४) व कॉलिन मुन्रोचा ( ६३५) विक्रम मोडला.
सूर्या व विराट यानी ४२ चेंडूंत १०२ धावांची भागीदारी केली. १९व्या षटकात सूर्या रन आऊट झाला. त्याने २२ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकारांसह ६१ धावांची वादळी खेळी केली. दिनेश कार्तिकने अखेरच्या षटकात तुफान फटकेबाजी केली, परंतु विराटला २८ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारांसह ४९ धावांवर नाबाद राहावे लागले. कार्तिकने ७ चेंडूंत १७ धावा करताना भारताला ३ बाद २३७ धावांचा पल्ला गाठून दिला. १९व्या षटकात विराट ४९ धावांवर होता आणि २०व्या षटकात कार्तिककडे स्ट्राईक होती. पहिला चेंडू निर्धाव पडल्यानंतर कार्तिकने दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला. त्यानंतर पुन्हा निर्धावर चेंडू व Wide चेंडू पडला. इतक्यात कार्तिक विराटकडे पळत आला अन् एक धाव करून स्ट्राईक देतो म्हणाला. तेव्हा विराटने तू खेळ संघाला धावांची गरज आहे असे म्हणून आपल्या अर्धशतकाचा विचार नाही केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IND vs SA, 2nd T20I Live Updates : Virat Kohli becomes the first Indian to complete 11,000 runs in T20 history, he just told Dinesh Karthik to continue the hitting when he was in 49 runs, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.