IND vs SA, 2nd T20I Live Updates : सूर्यकुमार यादवच्या विकेटला Virat Kohli जबाबदार? नेटिझन्सना झाला राग अनावर, Video  

India vs South Africa, 2nd T20I Live Updates : सूर्यकुमार रन आऊट झाल्याने नेटिझन्सनी  त्याचा राग विराटवर काढण्यास सुरुवात केली. विराटला स्वतःच्या विकेटचा त्याग करायला हवा होता, असा सूर सोशल मीडियावर सुरू आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 09:02 PM2022-10-02T21:02:29+5:302022-10-02T21:03:32+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA, 2nd T20I Live Updates : Virat Kohli should have sacrificed himself to kept Suryakumar Yadav in the middle, Watch Video | IND vs SA, 2nd T20I Live Updates : सूर्यकुमार यादवच्या विकेटला Virat Kohli जबाबदार? नेटिझन्सना झाला राग अनावर, Video  

IND vs SA, 2nd T20I Live Updates : सूर्यकुमार यादवच्या विकेटला Virat Kohli जबाबदार? नेटिझन्सना झाला राग अनावर, Video  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs South Africa, 2nd T20I Live Updates : भारताच्या आघाडीच्या चार फलंदाजांनी आज वादळी खेळी केली. रोहित शर्मा व लोकेश राहुल यांच्या ९६ धावांच्या सलामीनंतर सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) व विराट कोहली यांनी शतकी धावा जोडल्या. सूर्याने तर अक्षरशः कहर करताना आफ्रिकन खेळाडूंना रडकुंडीला आणले. पण, सूर्यकुमार रन आऊट झाल्याने नेटिझन्सनी  त्याचा राग विराटवर काढण्यास सुरुवात केली. विराटला स्वतःच्या विकेटचा त्याग करायला हवा होता, असा सूर सोशल मीडियावर सुरू आहे. 
 


भारत-दक्षिण आफ्रिका दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात लोकेश राहुल व रोहित शर्मा ( Rohit Sharma) या जोडीने आज कुणाचेच ऐकायचे नाही हा निर्धार केलेला दिसला.  रोहितने मारलेले उत्तुंग फटके आणि लोकेशची तंत्रशुद्ध फलंदाजी चाहत्यांना खिळवणारी ठरली.  रोहित ३७ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ४३ धावांवर बाद झाला अन् भारताला ९६ धावांवर पहिला धक्का बसला. केशव महाराजने त्याच्या अखेरच्या षटकात लोकेशला LBW केले. लोकेशने २८ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ५७ धावा चोपल्या. महाराजने ४ षटकांत २३ धावा देताना या दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.

फॉर्मात असलेल्या सूर्यकुमार यादवने आफ्रिकेच्या गोलंदाजांना कुटून  काढले. त्याने कागिसो रबाडाच्या एका षटकात २२ धावा चोपल्या आणि ट्वेंटी-२०त १००० धावा पूर्ण केल्या. सर्वात कमी चेंडूंत १००० धावा करण्याचा विक्रमही त्याने नावावर केला. सूर्याने ५७३ चेंडूंत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त १००० + धावा करताना ग्लेन मॅक्सवेलचा ( ६०४) व कॉलिन मुन्रोचा ( ६३५) विक्रम मोडला.  त्याने भारतीयांमध्ये सर्वात कमी डावात हा टप्पा ओलांडण्याचा विक्रमात रोहितला मागे टाकले. त्याने ५ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने १८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. सूर्या व विराट यानी ४२ चेंडूंत १०२ धावांची भागीदारी केली. १९व्या षटकात सूर्या रन आऊट झाला. त्याने २२ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकारांसह ६१ धावांची वादळी खेळी केली. विराटने स्वतःच्या विकेटचा त्याग करायला हवा होता असे चाहत्यांचे म्हणणे आहे. 

पाहा व्हिडीओ...


दिनेश कार्तिकने अखेरच्या षटकात तुफान फटकेबाजी केली, परंतु विराटला २८ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारांसह ४९ धावांवर नाबाद राहावे लागले. कार्तिकने ७ चेंडूंत १७ धावा करताना भारताला ३ बाद २३७ धावांचा पल्ला गाठून दिला 
 

Web Title: IND vs SA, 2nd T20I Live Updates : Virat Kohli should have sacrificed himself to kept Suryakumar Yadav in the middle, Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.