पावसाची कृपा! दक्षिण आफ्रिकेने दुसरा सामना जिंकला, प्रशिक्षक राहुल द्रविड संतापला

India vs South Africa 2nd T20I Marathi Updates : पावसामुळे निसरड्या झालेल्या मैदानाचा दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी पुरेपूर फायदा उचलला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 12:27 AM2023-12-13T00:27:06+5:302023-12-13T00:27:45+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA 2nd T20I : South Africa defeated India by 4 wickets, Chase down 152 runs from 13.5 overs | पावसाची कृपा! दक्षिण आफ्रिकेने दुसरा सामना जिंकला, प्रशिक्षक राहुल द्रविड संतापला

पावसाची कृपा! दक्षिण आफ्रिकेने दुसरा सामना जिंकला, प्रशिक्षक राहुल द्रविड संतापला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs South Africa 2nd T20I Marathi Updates : पावसामुळे निसरड्या झालेल्या मैदानाचा दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी पुरेपूर फायदा उचलला. भारताने १९.३ षटकांत १८० धावा उभ्या केल्या, परंतु पावसामुळे यजमान दक्षिण आफ्रिकेसमोर १५ षटकांत १५२ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवले गेले. ओलसर मैदानावर गोलंदाजांना फार मदत मिळाली नाही आणि आफ्रिकेच्या फलंदाजांनी सुरुवातच दणक्यात करून टाकली. यजमान आफ्रिकेने दुसरी ट्वेंटी-२० मॅच जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मैदान पूर्णपणे न सुकवता सामना खेळवला गेल्याने टीम इंडियाचा प्रशिक्षक राहुल द्रविडही संतापलेला दिसला. 

Video : आफ्रिकेच्या फलंदाजाने सोडले क्रिज, चेंडू जितेशकडे न फेकता दिला जडेजाकडे अन्... 

रिझा हेंड्रीक्स व मॅथ्यू ब्रेत्टकी यांनी आफ्रिकेला आक्रमक सुरुवात करून दिली. मोहम्मद सिराजच्या पहिल्याच षटकात दोघांनी १४ धावा कुटल्या. अर्शदीप सिंगच्या एका षटकात २४ धावा चोपून आफ्रिकेने दोन षटकांतच ३८ धावा उभ्या केल्या. तिसऱ्या षटकातील पाचव्या चेंडूवर हेंड्रीक्स व ब्रेत्टकी यांच्यातला ताळमेळ चूकला. ब्रेत्टकी ७ चेंडूंत १६ धावांवर रन आऊट झाला. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १७ चेंडूंत ४२ धावा जोडल्या. पण, याचा फार फरक आफ्रिकेच्या फटकेबाजीवर पडला नाही. एडन मार्करमने सलग तीन चौकाराने दडपण झुगारून दिले. दुसऱ्या बाजूने हेंड्रीक्स फटकेबाजी करत होताच. या दोघांची ३० चेंडूंत ५४ धावांची भागीदारी मुकेश कुमारने तोडली. मार्करम १७ चेंडूंत ३० धावा करून बाद झाला.  


आफ्रिकेने ८.२ षटकांत शतकी पल्ला पार केला. कुलदीप यादवने आणखी एक यश मिळवून दिले. २७ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ४९ धावांवर हेंड्रीक्सला त्याने तंबूचा रस्ता दाखवला. पुढच्या षटकात सिराजने आफ्रिकेच्या हेनरिच क्लासेनला ( ७) झेल देण्यास भाग पाडले. १८ चेंडूंत २४ धावा आफ्रिकेला करायच्या होत्या. १३व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर डेव्हिड मिलरने डिप स्क्वेअर लेगच्या दिशेने खणखणीत षटकार खेचला. पण, मुकेशने पुन्हा तसाच चेंडू टाकला, परंतु यावेळी त्याची गती संथ ठेवली अन् मिलर ( १७) तसाच फटका मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला.  १३ चेंडू, १३ धावा असा सामना चुरशीचा झाला. जडेजाने टाकलेल्या १४व्या षटकात त्रिस्तान स्टब्सने चौकार खेचून दडपण हलकं केलं. त्यात अँडिले फेहलुकवायोने षटकार खेचून मॅच संपवली. आफ्रिकेने ५ विकेट्स राखून बाजी मारली. १३.५ षटकांत त्यांनी ५ बाद १५४ धावा केल्या. 


तत्पूर्वी, सूर्यकुमार यादव ( ५६), रिंकू सिंग ( नाबाद ६८) आणि तिलक वर्मा ( २९) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने १९.३ षटकांत ७ बाद १८० धावा उभ्या केल्या. पावसामुळे बराच वेळ वाया गेल्याने षटकांची संख्या १५ करण्यात आली आहे आणि दक्षिण आफ्रिकेला १५ षटकांत १५२ धावांचे ठेवले गेले. रिंकूने ३९ चेंडू ९ चौकार व २ षटकारांसह नाबाद ६८ धावा केल्या.
 

Web Title: IND vs SA 2nd T20I : South Africa defeated India by 4 wickets, Chase down 152 runs from 13.5 overs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.