भारताची पहिली फलंदाजी; पण, सलामीवीर पडला आजारी, सामन्यातून घेतली माघार 

India vs South Africa 2nd T20I Marathi Updates :  भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आज दुसरा ट्वेंटी-२० सामना ग्याबेखा येथे होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 08:11 PM2023-12-12T20:11:56+5:302023-12-12T20:12:31+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA 2nd T20I : South Africa have won the toss and have opted to field; Ruturaj Gaikwad was unavailable for selection for the 2nd T20I due to illness: BCCI       | भारताची पहिली फलंदाजी; पण, सलामीवीर पडला आजारी, सामन्यातून घेतली माघार 

भारताची पहिली फलंदाजी; पण, सलामीवीर पडला आजारी, सामन्यातून घेतली माघार 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs South Africa 2nd T20I Marathi Updates :  भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आज दुसरा ट्वेंटी-२० सामना ग्याबेखा येथे होणार आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर याही सामन्यावर पावसाचे सावट आहे. नाणेफेकीला ४० मिनिटे शिल्लक असताना पावसाची सुरुवात झाल्याने चाहत्यांची चिंता वाढली होती. पण, वरुण राजाची कृपा झाली आणि मॅच वेळेत सुरू झाली. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करणार आहे, परंतु स्टार सलामीवीर आजारी पडल्याने आज खेळू शकणार नाही. 


भारतीय संघाने मागील चार ट्वेंटी-२० सामन्यांत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २ विजय मिळवले आहेत, तर २ सामने ड्रॉ राहिले आहेत. २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेने ( २-०) भारताविरुद्ध शेवटची ट्वेंटी-२० मालिका जिंकली होती. २०२३ मध्ये भारताकडून सर्वाधिक २५ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाचा मान अर्शदीप सिंगने पटकावला आहे. जगातील गोलंदाजांमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर येतो. दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरने ९९ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यांत १०६ षटकार खेचले आहेत. त्याच्यापेक्षा एकाही आफ्रिकन खेळाडूला अधिक षटकार खेचता आलेले नाहीत.   


शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड हे तीन सलामीवीर आजच्या प्लेइंग इलेव्हनसाठी शर्यतीत होते. पण, ऋतुराज आजारी पडल्याने आज खेळू शकणार नाही. त्यामुळे शुबमन व यशस्वी सलामीला खेळणार आहेत.


भारतीय संघ - यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, जितेश शर्मा, रवींद्र जडेजा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार ( India: Yashasvi Jaiswal, 2 Shubman Gill, 3 Tilak Varma, 4 Suryakumar Yadav (capt), 5 Rinku Singh, 6 Jitesh Sharma (wk), 7 Ravindra Jadeja, 8 Arshdeep Singh, 9 Kuldeep Yadav, 10 Mohammed Siraj, 11 Mukesh Kumar) 

दक्षिण आफ्रिका - रिझा हेंड्रीक्स, मॅथ्यू ब्रित्झ्के, एडन मार्करम, हेनरिच क्लासेन, डेव्हिड मिलर, त्रिस्तान स्टब्स, मार्को यानसेन, एंडिले फेहलुकवायो, गेराल्ड कोएत्झी, लिझाड विलियम्स, तब्रेझ शम्सी ( South Africa: 1 Reeza Hendricks, 2 Matthew Breetzke, 3 Aiden Markram, 4 Heinrich Klaasen (wk), 5 David Miller, 6 Tristan Stubbs, 7 Marco Jansen, 8 Andile Phehlukwayo, 9 Gerald Coetzee, 10 Lizaad Williams, 11 Tabraiz Shamsi) 

 

Web Title: IND vs SA 2nd T20I : South Africa have won the toss and have opted to field; Ruturaj Gaikwad was unavailable for selection for the 2nd T20I due to illness: BCCI      

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.