पावसामुळे खेळ खंडोबा! भारताच्या १८० धावा, पण आफ्रिकेसमोर विजयासाठी १५२ धावांचे लक्ष्य

India vs South Africa 2nd T20I Marathi Updates : रिंकू सिंगने ( Rinku Singh) त्याची ट्वेंटी-२० संघातील निवड आजही सार्थ ठरवली...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 11:08 PM2023-12-12T23:08:13+5:302023-12-12T23:08:22+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA 2nd T20I : South Africa need 152 to win, match reduced to 15 overs | पावसामुळे खेळ खंडोबा! भारताच्या १८० धावा, पण आफ्रिकेसमोर विजयासाठी १५२ धावांचे लक्ष्य

पावसामुळे खेळ खंडोबा! भारताच्या १८० धावा, पण आफ्रिकेसमोर विजयासाठी १५२ धावांचे लक्ष्य

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs South Africa 2nd T20I Marathi Updates : रिंकू सिंगने ( Rinku Singh) त्याची ट्वेंटी-२० संघातील निवड आजही सार्थ ठरवली... शुबमन गिल व यशस्वी जैस्वाल शून्यावर माघारी परतल्यानंतर तिलक वर्माने आक्रमक फटकेबाजी करून दक्षिण आफ्रिकेला बॅकफूटवर फेकले.   सूर्यकुमार यादव व रिंकू सिंग यांनी अर्धशतक झळकावले. कर्णधार सूर्या माघारी परतल्यानंतर रिंकूने सूत्र हाती घेतली आणि आफ्रिकेच्या गोलंदाजांना चोपून काढले.  

रिंकू सिंगने मैदान गाजवले, Six असा खेचला की तुटली काच; पाहा Video 


तिलक वर्माने तिसऱ्या विकेटसाठी सूर्यकुमारसह २४ चेंडूंत ४९ धावांची भागीदारी केली. तिलक २० चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह २९ धावांवर बाद झाला सूर्यासोबत रिंकू सिंगने ४८ चेंडूंत ७० धावा जोडल्या.  सूर्यकुमार ३६ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ५६ धावांवर झेलबाद झाला. रवींद्र जडेजा १४ चेंडूंत १९ धावांवर बाद झाला, परंतु रिंकूसह त्याने ३८ धावा जोडल्या. गेराल्ड कोएत्झीने सलग दुसऱ्या चेंडूवर अर्शदीप सिंगला माघारी पाठवले. १९.३ षटकांनंतर पाऊस सुरू झाला आणि सामना थांबवण्यात आला. भारताने ७ बाद १८० धावा केल्या आहेत. 


पावसामुळे बराच वेळ वाया गेल्याने षटकांची संख्या १५ करण्यात आली आहे आणि दक्षिण आफ्रिकेला १५ षटकांत १५२ धावांचे लक्ष्य पार करावे लागणार आहे. ११.१० मिनिटांनी मॅच सुरू होईल. 


 

Web Title: IND vs SA 2nd T20I : South Africa need 152 to win, match reduced to 15 overs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.