सूर्याकुमार यादव, रिंकू सिंग यांचे अर्धशतक; दक्षिण आफ्रिकेच्या मदतीला २०व्या षटकात पाऊस आला

India vs South Africa 2nd T20I Marathi Updates : सूर्यकुमार यादवने कॅप्टन्स इनिंग्ज खेळताना टीम इंडियाचा गडगडलेला डाव सावरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 10:14 PM2023-12-12T22:14:42+5:302023-12-12T22:15:30+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA 2nd T20I : Suryakumar Yadav ( 56) , MAIDEN T20I FIFTY BY RINKU SINGH & Tilak Verma 29 runs, India 180-7, rain stop played  | सूर्याकुमार यादव, रिंकू सिंग यांचे अर्धशतक; दक्षिण आफ्रिकेच्या मदतीला २०व्या षटकात पाऊस आला

सूर्याकुमार यादव, रिंकू सिंग यांचे अर्धशतक; दक्षिण आफ्रिकेच्या मदतीला २०व्या षटकात पाऊस आला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs South Africa 2nd T20I Marathi Updates : सूर्यकुमार यादवने कॅप्टन्स इनिंग्ज खेळताना टीम इंडियाचा गडगडलेला डाव सावरला. दोन्ही सलामीवीर भोपळ्यावर माघारी परतल्यानंतर तिलक वर्माने भारताची गाडी रुळावर आणली. त्याच्या फटकेबाजीनंतर सूर्याने अर्धशतक झळकावून विक्रमांना गवसणी घातली. त्यानंतर रिंकू सिंग ( Rinku Singh) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले अर्धशतक झळकावले. 


भारताचे दोन्ही सलामीवीर शुबमन गिल व यशस्वी जैस्वाल भोपळ्यावर माघारी परतल्यानंतर तिलक वर्माने दक्षिण आफ्रिकेला झोडून काढले. २०१६ मध्ये पाकिस्तानविरुद्ध रोहित शर्मा व अजिंक्य रहाणे हे दोन्ही सलामीवीर शून्यावर बाद झाले होते. तिलक वर्माने आक्रमक फटकेबाजी करताना मार्को यानसेनच्या एका षटकात १९ धावा कुटल्या. त्याने कर्णधार सूर्यकुमारसह २४ चेंडूंत ४९ धावांची भागीदारी केली. गेराल्ड कोएत्झीने ही जोडी तोडली. तिलक २० चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह २९ धावांवर बाद झाला.  तिलकच्या विकेटनंतर भारताच्या धावांचा वेग काहीसा मंदावला होता, परंतु सूर्याचे खेळपट्टीवर असणे आश्वासक होते. त्याने २९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. भारताकडून आफ्रिकेत ट्वेंटी-२०त अर्धशतक झळकावणारा तो पहिला कर्णधार ठरला.  


सूर्यासोबत रिंकू सिंग यांनी भारताचा डाव सावरताना ४८ चेंडूंत ७० धावा जोडल्या. तब्रेझ शम्सीने ही जोडी तोडली. सूर्यकुमार ३६ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ५६ धावांवर झेलबाद झाला. रिंकू सिंगने ३० चेंडूंत त्याचे पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकावले. जितेश शर्मा १ धावेवर माघारी परतला. पण, रिंकू व रवींद्र जडेजा यांनी भारताला मोठी धावसंख्या उभारून दिली. जडेजा १४ चेंडूंत १९ धावांवर बाद झाला, परंतु रिंकूसह त्याने ३८ धावा जोडल्या. गेराल्ड कोएत्झीने सलग दुसऱ्या चेंडूवर अर्शदीप सिंगला ( ० माघारी पाठवले. १९.३ षटकांनंतर पाऊस सुरू झाला आणि सामना थांबवण्यात आला. भारताने ७ बाद १८० धावा केल्या आहेत. रिंकू ३९ चेंडू ९ चौकार व २ षटकारांसह ६८ धावांवर नाबाद आहे. 

Web Title: IND vs SA 2nd T20I : Suryakumar Yadav ( 56) , MAIDEN T20I FIFTY BY RINKU SINGH & Tilak Verma 29 runs, India 180-7, rain stop played 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.