Join us  

सूर्यकुमार यादव 'कॅप्टन' म्हणून हिट ठरला, आतापर्यंत एकाही भारतीयाला न जमलेला पराक्रम केला

India vs South Africa 2nd T20I Marathi Updates : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आज दुसरा ट्वेंटी-२० सामना ग्याबेखा येथे होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 9:35 PM

Open in App

India vs South Africa 2nd T20I Marathi Updates : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आज दुसरा ट्वेंटी-२० सामना ग्याबेखा येथे होत आहे. भारताचे दोन्ही सलामीवीर पहिल्या दोन षटकांत भोपळ्यावर माघारी परतले. शुबमन गिल व यशस्वी जैस्वाल यांना आफ्रिकन गोलंदाजांनी बाद केले. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त भारताचे दोन्ही सलामीवीर भोपळ्यावर जाण्याची ही दुसरी वेळ ठरली. २०१६ मध्ये पाकिस्तानविरुद्ध रोहित शर्मा व अजिंक्य रहाणे शून्यावर बाद झाले होते. तिलक वर्माने आक्रमक फटकेबाजी करताना मार्को यानसेनच्या एका षटकात १९ धावा कुटल्या. सूर्यकुमार यादवनेही हळुहळू हात मोकळे केले. सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त भारताकडून २००० धावा पूर्ण केल्या आणि असा पराक्रम करणारा तो चौथा फलंदाज ठरला.    तिलक व सूर्या या जोडीने २४ चेंडूंत ४९ धावांची भागीदारी केली. गेराल्ड कोएत्झीने ही जोडी तोडली. तिलक २० चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह २९ धावांवर बाद झाला. सूर्याने सर्वात कमी म्हणजेच ११६४ चेंडूंत २००० धावांचा विक्रम नावावर करताना आरोन फिंच ( १२८३), ग्लेन मॅक्सवेल ( १३०४) व डेव्हिड मिलर ( १३९८) यांना मागे टाकले. तिलकच्या विकेटनंतर भारताच्या धावांचा वेग काहीसा मंदावला होता, परंतु सूर्याचे खेळपट्टीवर असणे आश्वासक होते. त्याने २९ चेंडूंत अर्धशक पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ट्वेंटी-२० तील ही त्याची चौथी ५०+ धावांची खेळी ठरली आणि त्याने ( ५ इनिंग्ज) मोहम्मद रिझवान ( ११ इनिंग्ज) व जॉनी बेअरस्टो ( १३ इनिंग्ज) यांना मागे टाकले. भारताकडून आफ्रिकेत ट्वेंटी-२०त अर्धशतक झळकावणारा तो पहिला कर्णधार ठरला.  

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकासूर्यकुमार अशोक यादव