Join us  

१४७ वर्षांच्या कसोटी इतिहासात भारताच्या नावावर लाजीरवाणी कामगिरी, अनुष्कासह सारेच shocked

IND vs SA 2nd Test Live Updates Marathi : कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाच्या नावावर लाजीरवाणा विक्रम नोंदवला गेला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2024 7:56 PM

Open in App

IND vs SA 2nd Test Live Updates Marathi (Marathi News) :  कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाच्या नावावर लाजीरवाणा विक्रम नोंदवला गेला. रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी चांगला खेळ करून सावरलेला डाव नांद्रे बर्गरने मोडला. त्यानंतर लुंगी एनगिडी व कागिसो रबाडा यांच्या ११ चेंडूंत भारताने ६ विकेट्स गमावल्या आणि मोठी आघाडी घेण्याची संधी गमावली. विराट कोहली ४६ धावांवर बाद झाला. भारताने शून्य धावेवर या ६ विकेट्स गमावल्या आणि ही पडझड पाहून सारेच शॉक्ड झाले. अनुष्का शर्मा व अथिया शेट्टीही अवाक् झालेले दिसले. 

मोहम्मद सिराजने ( Mohammed Siraj ) दुसऱ्या कसोटीत ९-३-१५-६ अशी भन्नाट गोलंदाजी करून दक्षिण आफ्रिकेला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. जसप्रीत बुमराह व मुकेश कुमार यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेऊन आफ्रिकेचा पहिला डाव १२१ मिनिटांत ५५ धावांत गुंडाळला. सलामीवीर यशस्वी जैस्वाल भोपळ्यावर कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर माघारी परतला. पण, कर्णधार रोहित शर्मा आणि शूबमन गिल यांनी ५५ धावांची भागीदारी करून डाव सावरला. रोहित ३९ धावांवर माघारी परतला. त्यापाठोपाठ नांद्रे बर्गरने शुबमन ( ३६) व श्रेयस अय्यर ( ०) यांची विकेट घेतली. 

सामन्याला खरी कलाटणी ३४व्या षटकात मिळाली. लुंगी एनगिडीने एकाच षटकात लोकेश राहुल (८), रवींद्र जडेजा ( ०) व जसप्रीत बुमराह ( ०) यांना माघारी पाठवले. पुढच्याच षटकात कागिसो रबाडाने विराटची ( ४६) विकेट मिळवून दिली. त्यानंतर मोहम्मद सिराज रन आऊट झाला आणि प्रसिद्ध कृष्णा ( ०) झेल देऊन माघारी परतला. आफ्रिकेने भारताचा डाव १५३ धावांवर गुंडाळला. भारताला पहिल्या डावात ९८ धावांची आघाडी घेता आली. 

  • - कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच सहा विकेट्स शून्यावर पडल्या आहेत. यापूर्वी शून्य धावेवर ४ विकेट्स पडल्याच्या ४५, तर शून्यावर ५ विकेट्सच्या तीन प्रसंग घडलेले. 
  • - एखाद्या संघाच्या शेवटच्या सहा फलंदाजांनी केलेली ही सर्वात खराब कामगिरी आहे. १९९०मध्ये इंग्लंडचे ६ फलंदाज ३ धावांवर ( वि. ऑस्ट्रेलिया), तर २००१ मध्ये न्यूझीलंडचे ६ फलंदाज ४ धावांवर ( वि. पाकिस्तान) माघारी परतले होते.
  • - २०१९मध्ये लॉर्ड्स येथे इंग्लंड विरुद्ध आयर्लंड कसोटीत सलामीच्या दिवशी २० धावा पडल्या होत्या आणि त्यानंतर  आज असे घडले. 
  • - कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्याच दिवशी सर्वाधिक २५ विकेट्स पडल्याचा विक्रम १९०२ मध्ये घडलेला.  ऑस्ट्रेलियाच्या १५ ( १०-११२ व ५-४८) आणि इंग्लंडच्या ( १०-६१) अशा मिळून १५ विकेट्स पडल्या होत्या. 
टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाविराट कोहलीरोहित शर्माअनुष्का शर्मा