IND vs SA, 2nd Test Live Updates : शार्दूल ठाकूरनं बाजी पलटवली; अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजाराची स्थान टिकवण्याची धडपड सुरू झाली

India vs South Africa, 2nd Test Live Updates : शार्दूल ठाकूरनं ( Shardul Thakur) भारतीय संघाला सामन्यात जबरदस्त कमबॅक करून दिलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 09:05 PM2022-01-04T21:05:55+5:302022-01-04T21:07:39+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA, 2nd Test Live Updates : India 202 and 85/2 at Day 2 stumps against South Africa (229), lead by 58 runs in Johannesburg | IND vs SA, 2nd Test Live Updates : शार्दूल ठाकूरनं बाजी पलटवली; अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजाराची स्थान टिकवण्याची धडपड सुरू झाली

IND vs SA, 2nd Test Live Updates : शार्दूल ठाकूरनं बाजी पलटवली; अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजाराची स्थान टिकवण्याची धडपड सुरू झाली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs South Africa, 2nd Test Live Updates : शार्दूल ठाकूरनं ( Shardul Thakur) भारतीय संघाला सामन्यात जबरदस्त कमबॅक करून दिलं. जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या दिवसात शार्दूलनं ७ विकेट्स घेताना यजमानांचा पहिला डाव २२९ धावांवर गुंडाळला. शार्दूलनं ६१ धावांत ७ विकेट्स घेत अनेक मोठमोठे विक्रम मोडले. पण, भारताची दुसऱ्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. लोकेश राहुल व मयांक अग्रवाल झटपट माघारी परतले. संघातील स्थान वाचवण्यासाठी धडपडत असलेल्या अजिंक्य रहाणेचेतेश्वर पुजारा या जोडीनं जबाबदारीनं खेळ करताना टीम इंडियाचा डाव सावरला. 

भारताच्या २०२ धावांच्या प्रत्युत्तरात उतरलेल्या आफ्रिकेला मोहम्मद शमीनं चौथ्या षटकात सलामीवीर एडन मार्कराम ( ७) याला बाद करून धक्का दिला. कर्णधार डीन एल्गर व किगन पीटरसन यांनी सावध खेळ केला. दुसऱ्या दिवशीही ही जोडी फॉर्मात दिसत होती. त्यांची २११ चेंडूंतील ७४ धावांची भागीदारी शार्दूल ठाकूरनं संपुष्टात आणली. डीन एल्गर २८ धावांवर ( १२० चेंडू) बाद झाला. पीटरसननं पहिले अर्धशतक पूर्ण करताना संघाला शंभरी पल्ला पार करून दिला.  शार्दूलनं त्यानंतर पीटरसन ( ६२ ) व रॅसी व्हॅन डेर ड्युसन ( १) यांना माघारी पाठवलं.

आफ्रिकेची अवस्था ४ बाद १०२ अशी झाली होती. पण,  टेम्बा बवुमा व कायले वेरेयन यांनी टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली. त्यांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना आफ्रिकेला आघाडीच्या दिशेनं नेलं. पण, पुन्हा एकदा शार्दूल धावला. त्यानं वेरेयनला ( २१)  पायचीत पकडले. आफ्रिकेचा निम्मा संघ १६२ धावांवर माघारी परतला. त्यानंतर बवुमानं आक्रमक खेळ करण्यास सुरूवात करून शार्दूलला चौकार खेचून अर्धशतक पूर्ण केले, परंतु पढच्याच चेंडूवर शार्दूलनं त्याला तंबूची वाट दाखवली. ५१ धावांवर बवुमाचा यष्टिंमागे रिषभनं सुरेख झेल टिपला.

केशव महाराज व मार्को जॅन्सेन यांनी आठव्या विकेटसाठी ४८ चेंडूंत ३८ धावा जोडून आफ्रिकेची पहिल्या डावातील आघाडी निश्चित केली. जसप्रीतनं ही जोडी तोडताना महाराजला २१ धावांवर त्रिफळाचीत केले. त्यानंतर शार्दूलनं उर्वरित दोन्ही फलंदाज माघारी पाठवले. भारताच्या दुसऱ्या डावात लोकेश ( ८ ) व मयांक ( २३ ) यांना अनुक्रमे मार्को जॅन्सेन व ऑलिव्हर यांनी बाद केले. २ बाद ४४ धावांवरून अजिंक्य व पुजारा यांनी डाव सावरण्यास सुरूवात केली आणि दिवसअखेर भारताला २ बाद ८५ धावांपर्यंत मजल मारून ५८ धावांची आघाडी मिळवून दिली. पुजारा ३५, तर अजिंक्य ११ धावांवर खेळत आहेत.
 

Web Title: IND vs SA, 2nd Test Live Updates : India 202 and 85/2 at Day 2 stumps against South Africa (229), lead by 58 runs in Johannesburg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.