Join us  

IND vs SA, 2nd Test Live Updates : रिषभ पंतची चूक महागात पडणार, शार्दूल ठाकूरची एक विकेट कमी होणार?; पंच नियमानुसार दक्षिण आफ्रिकेच्या Van der Dussenला माघारी बोलवणार?, Video 

India vs South Africa, 2nd Test Live Updates : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2022 4:10 PM

Open in App

India vs South Africa, 2nd Test Live Updates : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताच्या पहिल्या डावातील प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेनं ४ बाद १०२ धावा केल्या आहेत. शार्दूल ठाकूरनं त्याच्या स्पेलमध्ये ५ षटकांत ८ धावा देताना तीन विकेट्स घेत टीम इंडियाला सामन्यात कमबॅक करून दिले. त्यानं दोन निर्धाव षटकं टाकली. पण, शार्दूलनं घेतलेली विकेट कमी होण्याची शक्यता उद्भवली आहे आणि नियमानुसार पंच हा निर्णय बदलू शकतात. त्यामुळे लंच ब्रेकनंतर नेमकं काय होतं, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.  

मयांक अग्रवाल ( २६), चेतेश्वर पुजारा ( ३) व अजिंक्य रहाणे ( ०) हे आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर लोकेश राहुलनं हनुमा विहारीसह डाव सावण्याचा प्रयत्न केला. पण, विहारी ( २०) धावांवर माघारी परतला अन् लोकेशही ( ५०) अर्धशतकानंतर बाद झाला. त्यानंतर आर अश्विन व रिषभ पंत यांनी  चांगला खेळ केला, परंतु रिषभला फार काळ खेळपट्टीवर टीकता आले नाही. अश्विननं मात्र ५० चेंडूंत ४६ धावा चोपल्या. जसप्रीतनं नाबाद १४ धावा करून संघाला दोनशेपार नेले.        

मोहम्मद शमीनं चौथ्या षटकात आफ्रिकेचा सलामीवीर एडन मार्कराम ( ७) याला बाद केले. त्यानंतर कर्णधार डीन एल्गर व किगन पीटरसन यांनी सावध खेळ केला. दुसऱ्या दिवशीही ही जोडी फॉर्मात दिसत होती. त्यांची २११ चेंडूंतील ७४ धावांची भागीदारी शार्दूल ठाकूरनं संपुष्टात आणली. डीन एल्गर २८ धावांवर ( १२० चेंडू) बाद झाला. पीटरसननं पहिले अर्धशतक पूर्ण करताना संघाला शंभरी पल्ला पार करून दिला.  शार्दूलनं त्यानंतर पीटरसन ( ६२ ) व रॅसी व्हॅन डेर ड्युसन ( १) यांना माघारी पाठवलं.  त्याच्या या धक्क्यांमुळे दक्षिण आफ्रिकेची अवस्था ४ बाद १०२ अशी झाली आहे. 

ड्युसन बाद होताच अम्पायरनं लंच ब्रेकचा कॉल दिला. खरं तर ड्युसनची विकेट वादात अडकली आहे. चेंडू रिषभ पंतच्या ग्लोव्ह्जमध्ये विसावण्यापूर्वी जमिनीवर टप्पा पडल्याचे रिप्लेत दिसले. ड्युसनही रिप्ले पाहण्यापूर्वी मैदानाबाहेर गेला. पण, नियमानुसार पुढील चेंडू टाकेपर्यंत अम्पायर त्यांचा निर्णय बदलू शकतात. आता नेमकं काय होतंय हे, लंच ब्रेकनंतरच स्पष्ट होईल.

 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाशार्दुल ठाकूररिषभ पंत
Open in App