Join us  

IND vs SA, 2nd Test Live Updates : विराट कोहली तिसऱ्या कसोटीलाही मुकणार?; लोकेश राहुलनं दिले मोठे अपडेट्स, जाणून घ्या नेमकं काय झालंय 

India vs South Africa, 2nd Test Live Updates : दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका विजय मिळवण्याच्या निर्धारानं मैदानावर उतरण्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2022 1:36 PM

Open in App

India vs South Africa, 2nd Test Live Updates : दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका विजय मिळवण्याच्या निर्धारानं मैदानावर उतरण्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं या सामन्यातून माघार घेतली. नाणेफेकीपूर्वी सर्व खेळाडू मैदानावर सराव करत असताना विराटची अनुपस्थिती चिंतेत टाकणारी होती. त्यात लोकेश राहुल ( KL Rahul) नाणेफेक करायला आल्यावर चाहत्यांची चिंता वाढली. दुसऱ्या कसोटीत विराट खेळणार नाही हे  स्पष्ट झाले. त्यात तिसऱ्या कसोटीत विराट खेळेल की नाही अशी शंका मनात घर करू लागली आहे. 

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीला आजपासून सुरूवात होत आहे. भारतीय संघानं सेंच्युरियनवर विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे आणि विराट कोहली अँड कंपनीला मालिका जिंकून इतिहास घडवण्याची संधी आहे. २९ वर्षांत भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकता आलेली नाही आणि जोहान्सबर्गचा इतिहास पाहता भारत येथे एकही सामना हरलेला नाही. पण, विराटचे नसणे हे दक्षिण आफ्रिकेला मानसिक समाधान देणारे आहे. 

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कर्णधारपदाचा कमी अनुभव असूनही बनले टीम इंडियाचे कर्णधार० सामना - अजिंक्य रहाणे१ सामना - महेंद्रसिंग धोनी/लोकेश राहुल२ सामने -  गुलबराय रामचंद३ सामने - वीरेंद्र सेहवाग/विराट कोहली  

विराटला नेमकं काय झालं? 

नाणेफेकीचा कौल बाजूनं लागल्यानंतर लोकेश राहुलनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी त्याला विराट का नाही, असे विचारण्यात आले आणि तो म्हणाला,''विराटला पाठदुखीचा त्रास होतोय. त्याच्या दुखापतीवर फिजिओ उपचार करत आहेत आणि आशा करतो की तिसऱ्या कसोटीसाठी तो पूर्णपणे तंदुरूस्त होईल.''

विराटनं दुसऱ्या कसोटीतून माघार घेतल्यानं त्याची १०० वी कसोटी ही भारतात होणार हे निश्चित झाले आहे. बंगळुरू येथे श्रीलंकेविरुद्ध तो कसोटीचे शतक पूर्ण करणार आहे. लोकेश राहुल आजच्या सामन्यात कर्णधार असेल, तर जसप्रीत बुमराहकडे उप कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.   दक्षिण आफ्रिकेचा संघ - डीन एल्गर, एडन मार्कराम, किगन पीटरसन, रॅसी व्हॅन ड्युसेन, टेम्बा बवुमा, कायले वेरेयने, मार्को जॅन्सेन, कागिसो रबाडा, केशव महाराज, ड्युन ऑलिव्हर, लुंगी एनगिडी ( SA XI: Dean Elgar(c), Aiden Markram, Keegan Petersen, Rassie vd Dussen, Temba Bavuma, Kyle Verreynne(w), Marco Jansen, Kagiso Rabada, Keshav Maharaj, Duanne Olivier, Lungi Ngidi; IN: K Verreynne, D Olivier- OUT: Q de Kock, W Mulder)

भारतीय संघ - लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, आर अश्विन, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज (  India XI: KL Rahul(c), Mayank Agarwal, Cheteshwar Pujara, Ajinkya Rahane, Hanuma Vihari, Rishabh Pant(w), Ravichandran Ashwin, Shardul Thakur, Mohammed Shami, Jasprit Bumrah, Mohammed Siraj)  

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाविराट कोहलीलोकेश राहुल
Open in App