IND vs SA 2nd Test (Marathi News) : मोहम्मद सिराजने ( Mohammed SIRAJ ) दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेची अवस्था बिकट केली आहे. पहिली कसोटी गमावल्यानंतर भारतीय संघ केप टाऊन येथे विजयाच्या निर्धाराने मैदानावर उतरला. मागील ३२ वर्षात भारताला एकदाही आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. याही वर्षी हाच निकाल कायम राहणे अपेक्षित आहे, परंतु दुसऱ्या कसोटीत भारतीय गोलंदाजांनी गाजवलेले वर्चस्व थक्क करणारे आहे.
मोहम्मद सिराजमुळे १२२ वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेवर ओढावली नामुष्की; Video
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. एडन मार्करम व डीन एल्गर ही सलामीची जोडी २० चेंडूच टिकली. सिराजने चौथ्या षटकात एडनला ( २) झेलबाद करून माघारी पाठवले. कर्णधार एल्गर ( ४) याचाही सिराजने त्रिफळा उडवून भारताला मोठं यश मिळवून दिलं. टॉनी डे जॉर्जी ( २) व पदार्पणवीर त्रिस्तान स्टब्स ( ३) हेही फार काही करू शकले नाही. जसप्रीत बुमराहने ९व्या षठकात स्टब्सला बाद केले, तर सिराजने जॉर्जीचा अडथळा दूर करून आफ्रिकेची अवस्था ४ बाद १५ अशी दयनीय केली.
दक्षिण आफ्रिकेची घरच्या मैदानावरील पहिल्या डावातील ही तिसरी निचांक कामगिरी ठरली. १९९९ मध्ये इंग्लंडविरुद्ध त्यांचे ४ फलंदाज २ धावांत, २००१ मध्ये श्रीलंकेविरुद्ध ४ फलंदाज १३ धावांत माघारी परतले होते. त्याआधी १८८९मध्ये इंग्लंडविरद्ध १६ धावांत ४ विकेट्स पडल्या होत्या. सिराज एक्स्प्रेस इथेच थांबली नाही आणि त्याने डेव्हिड बेडिंगहॅम ( १२) व मार्को यानसेन ( ०) यांचा अडथळा दूर करताना आफ्रिकेची अवस्था ६ बाद ३४ अशी केली. त्यात कायले वेरेयने ( १५) याच्या विकेटची भर पडली. सिराजने त्याच्या ८.५ षटकांत १५ धावा देताना ६ विकेट्स घेतल्या. ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली.
१९२७ मध्ये घरच्या मैदानावर शेवटचं आफ्रिकेचे ६ फलंदाज ३५ किंवा त्यापेक्षा कमी धावांवर ( ६-२६ वि. इंग्लंड, जोहान्सबर्ग) माघारी परतले होते. एकंदर १९३२ नंतर दोनवेळाच आफ्रिकेवर ही नामुष्की ओढावली होती. २०१५ नंतर आज आफ्रिकेचे ६ फलंदाज ३५ किंवा त्यापेक्षा कमी धावांवर तंबूत परतले आणि दोन्ही वेळा भारताविरुद्ध त्यांनी नांग्या टाकल्या.
Web Title: IND vs SA 2nd Test Live Updates Marathi : Mohammed SIRAJ ON FIRE, 6th wicket in just 8.5 overs, South Africa 45/7 after 17.5 overs,At home, the last time SA were six down for 35 or fewer runs was in 1927 against ENG in Jo'Burg (6/26).
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.