IND vs SA 2nd Test : भारतीय संघ कसोटी मालिका बरोबरीत सोडवण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरला. मोहम्मद सिराज व जसप्रीत बुमराह या जोडीने यजमान दक्षिण आफ्रिकेला दणके दिले. मागील ३२ वर्षात भारताला एकदाही आफ्रिकेच्या धरतीवर मालिका जिंकता आलेली नाही. यंदा देखील त्याचाच प्रत्यय पाहायला मिळाला अन् यजमानांनी वर्चस्व कायम ठेवले होते. पण, दुसऱ्या कसोटीत भारतीय गोलंदाजांनी कमाल केली.
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात दोन मोठे बदल करण्यात आले असून, रवींद्र जडेजा आणि मुकेश कुमार यांना संधी मिळाली आहे, तर आर अश्विन आणि शार्दुल ठाकूर यांना वगळण्यात आले आहे. एडन मार्करम व डीन एल्गर ही जोडी सलामीला आली आणि जेमतेम २० चेंडू टीकली... मोहम्मद सिराजने चौथ्या षटकात एडनला ( २) यशस्वी जैस्वालच्या हाती झेलबाद करून माघारी पाठवले. मागील सामन्यातील नायक आणि या कसोटीतील कर्णधार एल्गर ( ४) याचाही सिराजने त्रिफळा उडवून भारताला मोठं यश मिळवून दिलं.