India vs South Africa, 2nd Test Live Updates : भारताकडून कर्णधार लोकेश राहुल आणि आर अश्विन वगळता इतरांनी निराशाजनक कामगिरी केली. लोकेशच्या अर्धशतकानंतर अश्विनच्या ४६ धावांनी टीम इंडियाला समाधानकारक मजल मारून दिली. ५ बाद ११६ अशी अवस्था असताना अश्विन मैदानावर उतरला अन् दमदार खेळ केला आणि भारतानं २०२ धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात आफ्रिकेनं दिवसअखेर १ बाद ३५ धावा केल्या असून अजून ते १६७ धावांनी पिछाडीवर आहेत. पहिल्या दिवसावर यजमानांनी वर्चस्व गाजवलेलं असताना टीम इंडियाचे दोन प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यामुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवात काही खास झाली नाही. मोहम्मद शमीनं चौथ्या षटकात आफ्रिकेचा सलामीवीर एडन मार्कराम ( ७) याला बाद केले. त्यानंतर कर्णधार डीन एल्गर व किगन पीटरसन यांनी सावध खेळ केला. रिषभ पंतनं आफ्रिकेच्या पीटरसननं १२ धावांवर असताना जीवदान दिले. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर उडालेला झेल रिषभकडून सुटला. आफ्रिकेनं दिवसअखेर १ बाद ३५ धावा केल्या आहेत आणि ते अजूनही १६७ धावांनी पिछाडीवर आहेत.
विराट कोहलीनं कंबरेला उसण भरल्यानं माघार घेतली, श्रेयस अय्यर पोटात दुखत असल्यामुळे तो या कसोटीच्या निवड प्रक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकला नाही. तेच फलंदाजी करताना आर अश्विनच्या उजव्या हाताच्या बोटावर चेंडू आदळला. त्यामुळे तो दुखापतग्रस्त झाला, तर पहिल्या दिवसाचा खेळ संपायला काही मिनिटे शिल्लक असताना मोहम्मद सिराजनं मांडीचे स्नायू ताणल्यामुळे मैदान सोडले. त्याच्या दुखापतीबाबत आर अश्विन म्हणाला,त्याच्या दुखापतीवर वैद्यकिय टीम लक्ष ठेऊन आहेत. आशा करतो की तो बरा होऊन सर्वोत्तम देईल.