IND vs SA, 2nd Test Live Updates : शार्दूल ठाकूरनं कमालच केली, ७ विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेची वाट लावली; २९ वर्षांपूर्वीचा मोडला मोठा विक्रम

India vs South Africa, 2nd Test Live Updates : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ३७व्या षटकापर्यंत एकही षटक न फेकलेल्या शार्दूल ठाकूरनं ( Shardul Thakur) दुसऱ्या दिवशी कमाल केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 07:31 PM2022-01-04T19:31:44+5:302022-01-04T19:32:21+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA, 2nd Test Live Updates : Shardul Thakur finishes with 7 for 61 as South Africa are bowled out for 229, a lead of 27 runs | IND vs SA, 2nd Test Live Updates : शार्दूल ठाकूरनं कमालच केली, ७ विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेची वाट लावली; २९ वर्षांपूर्वीचा मोडला मोठा विक्रम

IND vs SA, 2nd Test Live Updates : शार्दूल ठाकूरनं कमालच केली, ७ विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेची वाट लावली; २९ वर्षांपूर्वीचा मोडला मोठा विक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs South Africa, 2nd Test Live Updates : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ३७व्या षटकापर्यंत एकही षटक न फेकलेल्या शार्दूल ठाकूरनं ( Shardul Thakur) दुसऱ्या दिवशी कमाल केली. त्यानं आफ्रिकेच्या ७ फलंदाजांना  माघारी पाठवताना टीम इंडियाला सामन्यात पुनरागमन मिळवून दिलं. कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच शार्दूलनं डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. शार्दूलनं ६१ धावांत ७ विकेट्स घेतल्या आणि दक्षिण आफ्रिकेचा डाव २२९ धावांवर गुंडाळला. आफ्रिकेनं पहिल्या डावात २७ धावांचीच आघाडी घेता आली. 

भारताच्या २०२ धावांच्या प्रत्युत्तरात उतरलेल्या आफ्रिकेला मोहम्मद शमीनं चौथ्या षटकात सलामीवीर एडन मार्कराम ( ७) याला बाद करून धक्का दिला. कर्णधार डीन एल्गर व किगन पीटरसन यांनी सावध खेळ केला. दुसऱ्या दिवशीही ही जोडी फॉर्मात दिसत होती. त्यांची २११ चेंडूंतील ७४ धावांची भागीदारी शार्दूल ठाकूरनं संपुष्टात आणली. डीन एल्गर २८ धावांवर ( १२० चेंडू) बाद झाला. पीटरसननं पहिले अर्धशतक पूर्ण करताना संघाला शंभरी पल्ला पार करून दिला.  शार्दूलनं त्यानंतर पीटरसन ( ६२ ) व रॅसी व्हॅन डेर ड्युसन ( १) यांना माघारी पाठवलं.

आफ्रिकेची अवस्था ४ बाद १०२ अशी झाली होती. पण,  टेम्बा बवुमा व कायले वेरेयन यांनी टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली. त्यांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना आफ्रिकेला आघाडीच्या दिशेनं नेलं. पण, पुन्हा एकदा शार्दूल धावला. त्यानं वेरेयनला ( २१)  पायचीत पकडले. आफ्रिकेचा निम्मा संघ १६२ धावांवर माघारी परतला. त्यानंतर बवुमानं आक्रमक खेळ करण्यास सुरूवात करून शार्दूलला चौकार खेचून अर्धशतक पूर्ण केले, परंतु पढच्याच चेंडूवर शार्दूलनं त्याला तंबूची वाट दाखवली. ५१ धावांवर बवुमाचा यष्टिंमागे रिषभनं सुरेख झेल टिपला.

केशव महाराज व मार्को जॅन्सेन यांनी आठव्या विकेटसाठी ४८ चेंडूंत ३८ धावा जोडून आफ्रिकेची पहिल्या डावातील आघाडी निश्चित केली. जसप्रीतनं ही जोडी तोडताना महाराजला २१ धावांवर त्रिफळाचीत केले. त्यानंतर शार्दूलनं उर्वरित दोन्ही फलंदाज माघारी पाठवले. दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतीय गोलंदाजानं केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी हरभजन सिंगनं १२० धावांत ७ विकेट्स घेतल्या होत्या. वंडरर्सवर २९ वर्षांपूर्वीचा अनिल कुंबळेचा विक्रम शार्दूलनं मोडला. येथे १९९२-९३मध्ये कुंबळेनं ५३ धावांत ६ विकेट्स घेतल्या होत्या.  
 

Web Title: IND vs SA, 2nd Test Live Updates : Shardul Thakur finishes with 7 for 61 as South Africa are bowled out for 229, a lead of 27 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.