India vs South Africa, 2nd Test Live Updates : भारताकडून कर्णधार लोकेश राहुल आणि आर अश्विन वगळता इतरांनी निराशाजनक कामगिरी केली. लोकेशच्या अर्धशतकानंतर अश्विनच्या ४६ धावांनी टीम इंडियाला समाधानकारक मजल मारून दिली. ५ बाद ११६ अशी अवस्था असताना अश्विन मैदानावर उतरला अन् दमदार खेळ केला. जोहान्सबर्गवर भारताकडून ७व्या क्रमांकाच्या फलंदाजानं केलेली ही सर्वोत्तम खेळी ठरली. मोहम्मद शमीनं दक्षिण आफ्रिकेला चौथ्याच षटकात धक्का देताना बॅकफूटवर टाकले. पण, डीन एल्गर व किगन पीटरसन यांनी संयमी खेळ करताना दिवसअखेर आणखी एक विकेट पडू दिली नाही. रिषभ पंतनं सोडलेला झेल भारताला महागात पडू शकतो.
लोकेश व मयांक यांची ३६ धावांची भागीदारी जॅन्सेननं संपुष्टात आणली. मयांक २६ धावांवर बाद झाला. त्यानंतर पुजारा व लोकेश यांनी १३ धावांची भागीदारी केली. ऑलिव्हरनं २४व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर अप्रतिम बाऊन्सरवर पुजाराला ( ३) माघारी जाण्यास भाग पाडले. पुढच्याच चेंडूवर अजिंक्य ( ०) स्लीपमध्ये झेल देऊन माघारी परतला. लोकेश व हनुमा विहारी यांनी चौथ्या विकेटसाठी चांगली भागीदारी केली. कागिसो रबाडाच्या अफलातून चेंडूवर रॅसी व्हॅन डेर ड्युसेननं सिली पॉईंटला भारी कॅच घेतला. विहारी २० धावांवर माघारी परतताच लोकेशह त्याची ४२ धावांची भागीदारीही संपुष्टात आली.
लोकेशनं संयमी खेळ दाखवताना कर्णधार म्हणून पहिले व एकूण १३ वे अर्धशतक पूर्ण केले. पण, जॅन्सेनच्या चेंडूवर लोकेशनं पूल शॉट मारला, परंतु कागिसो रबाडानं तितक्याच अप्रतिमपद्धतीनं तो टिपला. लोकेश १३३ चेंडूंत ९ चौकारांसह ५० धावांवर बाद झाला. रिषभ पंत व आर अश्विन यांनी झपटप ४० धावा जोडल्या, परंतु जॅन्सेननं पंतला बाद केले. शार्दूल ठाकूर ( ०) ऑलिव्हरच्या बाऊन्सरच्या जाळ्यात अडकला. अश्विननं टीम इंडियाला मोठा आधार दिला. त्यानं ५० चेंडूंत ६ चौकारासह ४६ धावा केल्या. भारताचा पहिला डाव २०२ धावांवर संपुष्टात आला. मार्को जॅन्सेन ( ४-३१), ड्युआने ऑलिव्हर ( ३-६४) आणि कागिसो रबाडा ( ३-६४) यांनी चांगली गोलंदाजी केली.
दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवात काही खास झाली नाही. मोहम्मद शमीनं चौथ्या षटकात आफ्रिकेचा सलामीवीर एडन मार्कराम ( ७) याला बाद केले. त्यानंतर कर्णधार डीन एल्गर व किगन पीटरसन यांनी सावध खेळ केला. रिषभ पंतनं आफ्रिकेच्या पीटरसननं १२ धावांवर असताना जीवदान दिले. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर उडालेला झेल रिषभकडून सुटला. आफ्रिकेनं दिवसअखेर १ बाद ३५ धावा केल्या आहेत आणि ते अजूनही १६७ धावांनी पिछाडीवर आहेत.
Read in English
Web Title: IND vs SA, 2nd Test Live Updates : Stumps on Day 1 - South Africa trailing by 167 runs in the first innings with 9 wickets hand
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.