Join us  

IND vs SA, 2nd Test Live Updates : कसोटी कारकीर्द वाचवण्यासाठी त्यांच्याकडे फक्त लास्ट इनिंग्ज; अजिंक्य, पुजारा यांच्यासाठी सुनील गावस्करांचं मोठं विधान 

India vs South Africa, 2nd Test Live Updates : चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या अनुभवी जोडीला आता भारताच्या कसोटी संघाच्या मधल्या फळीचा भार सांभाळताना जड जातोय.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2022 5:51 PM

Open in App

India vs South Africa, 2nd Test Live Updates : चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या अनुभवी जोडीला आता भारताच्या कसोटी संघाच्या मधल्या फळीचा भार सांभाळताना जड जातोय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी हे दोन्ही अनुभवी फलंदाज अपयशी ठरले अन् टीम इंडिया संकटात सापडली. पुजारा ३३ चेंडूंत ३ धावा करून माघारी परतला, तर अजिंक्य पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यामुळे आता कसोटी संघातील त्यांच्या स्थानाबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.  

भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांनीही पुजारा व अजिंक्य यांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केलीय. या दोघांना कसोटी कारकीर्द वाचवण्यासाठी फक्त एकच इनिंग्ज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. न्यूझीलंडविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणारा श्रेयस अय्यर प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा घेण्यासाठी सज्ज आहे. ''आज त्यांच्या बाद झाल्यानंतर आता पुजारा व रहाणे यांना कसोटी कारकीर्द वाचवण्यासाठी फक्त पुढचीच इनिंग्ज आहे. संघातील त्यांच्या स्थानाबद्दल प्रश्न विचारले जात होते आणि आज ज्या प्रकारे ते बाद झाले, ते पाहून आता पुढील वाटचाल अवघडच वाटतेय. पुढील डावातील कामगिरी त्यांचे भविष्य ठरवणारी ठरेल,''असे गावस्कर म्हणाले. 

डिसेंबर २०१९ पासून पुजारा व रहाणे यांनी मिळून २५.२३च्या सरासरीनं २२७१ धावा केल्या आहेत आणि १२ वेळी ही दोघं शून्यावर बाद झाली आहेत. २०२१मध्ये रहाणेनं १३ कसोटींत ४७९, तर पुजारानं १४ कसोटींत ७०२ धावा केल्या आहेत.   

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकासुनील गावसकरअजिंक्य रहाणेचेतेश्वर पुजारा
Open in App