India vs South Africa, 2nd Test Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीला आजपासून सुरूवात होत आहे. भारतीय संघानं सेंच्युरियनवर विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे आणि विराट कोहली अँड कंपनीला मालिका जिंकून इतिहास घडवण्याची संधी आहे. २९ वर्षांत भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकता आलेली नाही आणि जोहान्सबर्गचा इतिहास पाहता भारत येथे एकही सामना हरलेला नाही. त्यामुळे हा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे. पण, टीम इंडियाला सामना सुरू होण्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. विराट कोहली ( Virat Kohli) यानं आजच्या सामन्यातून माघार घेतली असून लोकेश राहुल ( KL Rahul) कर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे.
भारतीय संघानं जोहान्सबर्गवर पाच कसोटी सामने खेळले आहेत आणि त्यापैकी २ मध्ये विजय, तर ३ सामने अनिर्णित राखले आहेत. २००६मध्ये भारतानं येथे १२३ धावांनी विजय मिळवला होता, तर २०१८मध्ये ६३ धावांनी बाजी मारली होती. २०१८मध्ये वंडरर्समध्ये भारतीय संघ चार जलदगती गोलंदाज आणि हार्दिक पांड्या याच्यासह मैदानावर उतरले होते. २०१३मध्ये आर अश्विन खेळला होता, परंतु ४२ षटकांत त्याला एकही विकेट घेता आली नव्हती. २०१८मध्ये भारतानं ६३ धावांनी कसोटी जिंकली होती.
विराटला पाठीच्या दुखापतीमुळे खेळता आलेले नसल्याचे, लोकेश राहुलनं सांगितले. भारतानं या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ( India won the toss and decided to bat first.) विराट कोहलीच्या अनुपस्थितीत हनुमा विहारीला संधी मिळाली आहे.
भारतीय संघ - लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, आर अश्विन, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज
Web Title: IND vs SA, 2nd Test Live Updates : Virat Kohli misses out on the Johannesburg Test; KL Rahul to lead the Indian team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.