Join us  

रोहित शर्माची 'शिवी' अन् विराट कोहलीचं त्याला त्वरित उत्तर; सोशल मीडियावर Video Viral 

IND vs SA 2nd Test  (Marathi News) : रोहित शर्माची ( Rohit Sharma) मैदानावरील वागणुक ही सर्वांना माहित आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2024 4:26 PM

Open in App

IND vs SA 2nd Test  (Marathi News) : रोहित शर्माची ( Rohit Sharma) मैदानावरील वागणुक ही सर्वांना माहित आहे. तो सहकाऱ्यांशी बोलताना मागचा पुढचा विचार कधीच करत नाही. असाच एक प्रसंग भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पाहायला मिळाला. रोहित शर्माविराट कोहली यांच्यातल्या संभाषणाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  

शॉर्ट लेगवर उभ्या असलेल्या रोहितने ३४ वे षटक संपण्यापूर्वी नांद्रे बर्गरच्या विकेटसाठी DRS घ्यायचा की नाही, याचे संभाषण या व्हिडीओत ऐकू येत आहे. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर बर्गरला LBW करण्यासाठी रोहितने अपील केले. सिराजलाही DRS घ्यावा असे वाटत होते. पण, या संभाषणात भारतीय कर्णधाराने कोठेही शिवीगाळ केली. शीवी दिल्यानंतर तो म्हणाला आपल्याकडे तीन DRS शिल्लक आहेत, त्यातला एक घेतला तर काय बिघडतं. यावर विराट लगेच घेऊन टाक, घेऊन टाक. कोण जाणे बॅटला कड लागलेला नसावा, असे म्हणाला.   

 दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ५५ धावांवर गुंडाळल्यानंतर भारतीय संघाला मोठी आघाडी घेऊन डावाने कसोटी जिंकण्याची संधी होती. पण, रोहित शर्मा ( ३९), शुबमन गिल ( ३६) व विराट कोहली ( ४६) वगळल्यास अन्य फलंदाज अपयशी ठरले. भारताचा पहिला डाव ४ बाद १५३ वरून सर्वबाद १५३ असा गडगडला आणि ९८ धावांच्या आघाडीवर समाधान मानावे लागले. प्रत्युत्तरात, आफ्रिकेची गाडी दुसऱ्या डावातही घसरली. पण, एडन मार्करम उभा राहिला आणि त्याच्या १०३ चेंडूंत १७ चौकार व २ षटकारांनी १०६ धावांनी भारताला टेंशनमध्ये टाकले. मात्र, जसप्रीत बुमराहने ६१ धावा देत ६ विकेट्स घेऊन आफ्रिकेचा दुसरा डाव १७६ धावांवर गुंडाळला. भारतासमोर विजयासाठी ७९ धावांचे आव्हान आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाविराट कोहलीरोहित शर्मा