IND vs SA, 2nd Test : शार्दूल ठाकूरनं मिळवलेल्या यशावर पाणी फिरवलं; टेम्बा बवुमाला शिवी देऊन संकट ओढावून घेतलं?; Video Viral 

IND vs SA, 2nd Test : भारतीय संघाला जोहान्सबर्ग कसोटीत पराभव पत्करावा लागला असला तरी काही खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीनं प्रभावित केलं. शार्दूल ठाकूरने तर कसोटी गाजवली. त्यानं दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात ६१ धावांत ७ विकेट्स घेताना इतिहास घडवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 03:35 PM2022-01-07T15:35:42+5:302022-01-07T15:36:16+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA, 2nd Test : "What the F**k, man?", Bavuma moving away at last moment annoys Shardul, Video | IND vs SA, 2nd Test : शार्दूल ठाकूरनं मिळवलेल्या यशावर पाणी फिरवलं; टेम्बा बवुमाला शिवी देऊन संकट ओढावून घेतलं?; Video Viral 

IND vs SA, 2nd Test : शार्दूल ठाकूरनं मिळवलेल्या यशावर पाणी फिरवलं; टेम्बा बवुमाला शिवी देऊन संकट ओढावून घेतलं?; Video Viral 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs SA, 2nd Test : भारतीय संघाला जोहान्सबर्ग कसोटीत पराभव पत्करावा लागला असला तरी काही खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीनं प्रभावित केलं. लोकेश  राहुल, आर अश्विन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी यांनी फलंदाजीत संघर्षपूर्ण कामगिरी बजावली. शार्दूल ठाकूरने तर कसोटी गाजवली. त्यानं दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात ६१ धावांत ७ विकेट्स घेताना इतिहास घडवला. पण, या सामन्याच्या दुसऱ्या डावात त्याचा करिष्मा चालला नाही आणि त्यामुळे संतापलेल्या शार्दूलनं दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज टेम्बा बवुमा याला शिवी दिली. शार्दूलनं दिलेल्या शिवीचा आवाज स्टम्प्समधील माईकमध्ये कॅप्चर झाला आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या सामन्यात भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराह व आफ्रिकेच्या मार्को जॅन्सेन यांच्यातही शाब्दील बाचाबाची झाली होती. चौथ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात शार्दूलनं ही शिवी दिली. यजामन आफ्रिकेला विजयासाठी ९ धावांची गरज होती आणि  शार्दूल ६७वं षटक टाकण्यासाठी आला. त्या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी शार्दूल रन अप घेऊन जेव्हा नॉन स्ट्रायकर एंडच्या स्टम्पजवळ आला तेव्हा स्ट्राईकवर असलेल्या बवुमानं माघार घेतली. त्यानंतर चिडलेल्या शार्दूलनं शिवी दिली. याच सामन्यात लोकेश राहुलनं फलंदाजी करताना कागिसो रबाडासोबत असेच केले होते, तेव्हा अम्पायरनी त्याला ताकिद दिली होती. 

पाहा व्हिडीओ...


भारताच्या पहिल्या डावातील २०२ धावांच्या प्रत्युत्तरात यजमान आफ्रिकेनं २२९ धावा केल्या. शार्दूल ठाकूरनं ६१ धावांत ७ विकेट्स घेत आफ्रिकेला मोठी आघाडी घेऊ दिली नाही. पण, दुसऱ्या डावात भारतालाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांची अर्धशतकी खेळी अन् हनुमा विहारीच्या नाबाद ४० धावांच्या जोरावर भारतानं २ ६६ धावा करून आफ्रिकेसमोर २४० धावांचे लक्ष्य ठेवले. तिसऱ्या दिवसाच्या अखेरपर्यंत डीन एल्गरनं खिंड लढवत आफ्रिकेला २ बाद ११८ धावा उभारून दिल्या. चौथ्या दिवशी पावसामुळे साडेपाच तासांचा खेळ वाया गेला.  त्यानंतर ३४ षटकांच्या डावात आफ्रिकेनं ७ विकेट्स राखून विजय मिळवत इतिहास घडवला.

जोहान्सबर्गवर भारताचा हा पहिलाच कसोटी पराभव ठरला. यापूर्वी झालेल्या पाच सामन्यांत भारतानं दोन विजय मिळवले होते, तर तीन सामने ड्रॉ केले होते. राहुल द्रविड व विराट कोहली यांच्या नेतृत्वाखाली हे दोन्ही विजय आले होते. आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर १८८ चेंडूंचा सामना करताना १० चौकारांच्या मदतीनं ९६ धावांवर नाबाद राहिला. एडन मार्कराम ( ३१), रॅसी व्हॅन डेर ड्युसेन ( ४०), किगन पीटरसन ( २८) आणि टेम्बा बवुमा ( २३*) यांनी योगदान दिलं.  
 

Web Title: IND vs SA, 2nd Test : "What the F**k, man?", Bavuma moving away at last moment annoys Shardul, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.