IND vs SA, 3rd day 3 Test Live Updates : रिषभ पंतनं साजरं केलं खणखणीत शतक; १२ वर्षांपूर्वीचा MS Dhoniचा मोडला विक्रम, आशियाई यष्टिरक्षकाला जमला नाही असा पराक्रम 

India vs South Africa, 3rd day 3 Test Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीचा तिसरा दिवस हा दोन्ही संघांसाठी चढ-उतारांचा राहिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 06:43 PM2022-01-13T18:43:34+5:302022-01-13T18:45:20+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA, 3rd day 3 Test Live Updates : Rishabh Pant becomes the first Asian wicketkeeper to score Test century in South Africa | IND vs SA, 3rd day 3 Test Live Updates : रिषभ पंतनं साजरं केलं खणखणीत शतक; १२ वर्षांपूर्वीचा MS Dhoniचा मोडला विक्रम, आशियाई यष्टिरक्षकाला जमला नाही असा पराक्रम 

IND vs SA, 3rd day 3 Test Live Updates : रिषभ पंतनं साजरं केलं खणखणीत शतक; १२ वर्षांपूर्वीचा MS Dhoniचा मोडला विक्रम, आशियाई यष्टिरक्षकाला जमला नाही असा पराक्रम 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs South Africa, 3rd day 3 Test Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीचा तिसरा दिवस हा दोन्ही संघांसाठी चढ-उतारांचा राहिला. पहिल्या सत्रातील पहिल्या ११ चेंडूंवर भारताचे दोन अनुभवी फलंदाज माघारी पाठवून आफ्रिकेनं सामना मुठीत घेतला. पण, नंतर रिषभ पंत व विराट कोहली ( Rishabh Pant - Virat Kohli) यांनी ती पकड सैल करताना भारताला फ्रँटसीटवर आणून बसवले. इथेच रोमांच थांबला नाही. लुंगी एनगिडीनं विराटची विकेट घेतली अन् भारताचा डाव पुन्हा गडगडला... रिषभ पंत अखेरपर्यंत खेळपट्टीवर उभा राहिला आणि २०१० साली महेंद्रसिंग धोनीनं नावावर केलेला विक्रम रिषभनं आज मोडला. दक्षिण आफ्रिकेत शतक झळकावणारा तो पहिला आशियाई यष्टिरक्षक फलंदाज ठरला आहे. 

रिषभ पंत व विराट कोहली ( Rishabh Pant and Virat Kohli) या जोडीनं टीम इंडियाला तिसऱ्या कसोटीत कमबॅक मिळवून दिले. दक्षिण आफ्रिकेनं तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या ११ चेंडूंत चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे या अनुभवी जोडीला माघारी पाठवून मोठं यश मिळवलं होतं. पण, रिषभच्या आक्रमक फटकेबाजीनं त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवलं. भारताची दुसऱ्या डावातही सुरुवात निराशाजनक झाली. लोकेश राहुल ( १०),  मयांक अग्रवाल ( ७), चेतेश्वर पुजारा ( ९) आणि अजिंक्य रहाणे ( १) हे माघारी परतल्यानं भारताची अवस्था ४ बाद ५८ अशी झाली होती. पण, रिषभ व विराटनं टीम इंडियाचा डाव सावरला.  

रिषभ मागून येऊन अर्धशतक पूर्ण केले आणि विराटनं दुसऱ्या बाजूनं संयमी खेळ करून त्याला साथ दिली. पण, लंच ब्रेकनंतर भारताला पाचवा धक्का बसला. १४३ चेंडूंत २९ धावा करणारा विराट कोहली परतला माघारी परतला अन् रिषभ पंतसोबतची ९४ धावांची भागीदारी संपुष्टात आली. दक्षिण आफ्रिकेत कसोटीच्या दुसऱ्या डावात भारताच्या ५ किंवा त्या खालील क्रमांकावरील विकेटसाठी नोंदवलेली ही दुसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. या भागीदारीत महेंद्रसिंग धोनी व सचिन तेंडुलकर यांची १७२ ( २०१०, सेंच्युरियन) धावांची भागीदारी अव्वल क्रमांकावर आहे. कपिल देव व अनिल कुंबळे यांनी १९९२ मध्ये ७७ धावांची भागीदारी केली होती.

विराट माघारी परतला अन् भारताची गाडी घसरताना दिसली. आक्रमक मोडमध्ये असलेल्या रिषभला मग बचावात्मक खेळ करावा लागला. एका बाजूनं तो डाव सावरून होता, परंतु समोर विकेट पडल्या. आर अश्विन ( ७), शार्दूल ठाकूर (५) व उमेश यादव (०) हे झटपट माघारी परतले. ८८ धावांवर असताना रिषभला जीवदान मिळालं, महाराजनं झेल सोडला. मोहम्मद शमी बाद झाल्यानंतर रिषभ आक्रमक फटकेबाजी करू लागला. ९४ धावांवर त्याला टेम्बा बवुमाकडून जीवदान मिळाले अन् त्यानं सोडलेला चेंडू चौकार गेला. रिषभनं १३१ चेंडूंत शतक पूर्ण केलं.

दक्षिण आफ्रिकेत एकाच कसोटी डावात दोन किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. शिवाय त्यानं आफ्रिकेत कसोटी डावात सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी करणाऱ्या भारतीय यष्टिरक्षक-फलंदाजाचा विक्रम नावावर केला. २०१०मध्ये महेंद्रसिंग धोनीनं सेंच्युरियन कसोटीत ९० धावा केल्या होत्या आणि रिषभनं तो विक्रम आज मोडला.  
 

Web Title: IND vs SA, 3rd day 3 Test Live Updates : Rishabh Pant becomes the first Asian wicketkeeper to score Test century in South Africa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.