India vs South Africa, 3rd day 3 Test Live Updates : रिषभ पंत व विराट कोहली ( Rishabh Pant and Virat Kohli) या जोडीनं टीम इंडियाला तिसऱ्या कसोटीत कमबॅक मिळवून दिले. दक्षिण आफ्रिकेनं तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या ११ चेंडूंत चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे या अनुभवी जोडीला माघारी पाठवून मोठं यश मिळवलं होतं. पण, रिषभच्या आक्रमक फटकेबाजीनं त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवलं. रिषभ मागून येऊन अर्धशतक पूर्ण केले आणि विराटनं दुसऱ्या बाजूनं संयमी खेळ करून त्याला साथ दिली. पण, लंच ब्रेकनंतर भारताला पाचवा धक्का बसला. १४३ चेंडूंत २९ धावा करणारा विराट कोहली परतला माघारी परतला अन् रिषभ पंतसोबतची ९४ धावांची भागीदारी संपुष्टात आली.
भारताच्या पहिल्या डावातील २२३ धावांच्या प्रत्युत्तरात आफ्रिकेचा पहिला डाव २१० धावांवर गडगडला. भारताला आता दुसऱ्या डावात चांगली कामगिरी करून दाखवण्याची संधी होती. पण, लोकेश राहुल ( १०) व मयांक अग्रवाल ( ७) हे सलामीवीर याही डावात अपयशी ठरले. तिसऱ्या दिवसात पहिल्या ११ चेंडूंत चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे हे अनुभवी फलंदाज माघारी परतले आणि टीम इंडियाला मोठा धक्का बसला. ४ बाद ५८ वरून रिषभ व कर्णधार विराट कोहली यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. विराट बचावात्मक मोडमध्येच दिसला, परंतु रिषभ आज काहीतरी ठरवूनच आला होता. तो सुसाट खेळला.. त्यानं आफ्रिकेच्या एकाही गोलंदाजाला सोडलं नाही.
केशव महाराज हा तर त्याचा गिऱ्हाईकच ठरला. ४८व्या षटकात केशव महाराजच्या गोलंदाजीवर रिषभनं सलग दोन षटकार खेचले. रिषभनं मारलेला दुसरा षटकार इतका लांब होता की आफ्रिकेच्या खेळाडूंना चेंडू शोधण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागले
पाहा व्हिडीओ..