India vs South Africa, 3rd day 3 Test Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसात पहिल्या ११ चेंडूंत चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे हे अनुभवी फलंदाज माघारी परतले आणि टीम इंडियाला मोठा धक्का बसला. दिवसाच्या पहिल्याच षटकात मार्को येनसन यानं दुसऱ्याच चेंडूवर पुजाराला बाद केले, किगन पीटरसननं अफलातून झेल टिपला. त्यानंतर आलेल्या रहाणेला कागिसो रबाडानं भन्नाट चेंडू टाकून माघारी जाण्यास भाग पाडले. रहाणे बॅट मागे घेणार त्याआधीच चेंडू ग्लोव्ह्जला घासून यष्टिरक्षकाच्या दिशेनं गेला, परंतु त्याच्या हातून झेल सुटला होता. मात्र, स्लिपमध्ये उभ्या असलेल्या डीन एल्गनरनं संधी दवडली नाही.
चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांना घरच्या मैदानापाठोपाठ परदेशातही चांगली कामगिरी करता आलेली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेत पुजारानं ६ डावांत १२४ धावा केल्या आहेत, तर रहाणेला ६ डावांत १३६ धावा करता आल्या आहेत. या मालिकेत पुजारानं तीन सामन्यांत ६, १६, ३, ५३, ४३, ९ अशा, तर रहाणेनं ४८, २०, ०, ५८, ९ व १ अशा धावा केल्या आहेत. रहाणेनं २०२० मध्ये अखेरचं शतक झळकावलं होते, तर पुजारानं २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियविरुद्धच १९३ धावांची खेळी केली होती.
रहाणे त्याच्या कारकीर्दितील खराब फेजमधून जात आहे. त्यानं २०२० व २०२१ मध्ये अनुक्रमे ३८.८५ व १९.५७च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. रहाणेची खराब कामगिरी पाहिल्यानंतर आता सोशल मीडियावर #ThankYouRahane हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.
Web Title: IND vs SA, 3rd day 3 Test Live Updates : Thank you Rahane trends on Twitter as senior India batter flops again
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.