India vs South Africa, 3rd day 3 Test Live Updates : रिषभ पंतनं तिसऱ्या कसोटीचा तिसरा दिवस गाजवला. ४ बाद ५८ अशा अवस्थेत असलेल्या टीम इंडियाला रिषभ पंत व विराट कोहली या जोडीनं सावरलं. पण, विराट माघारी परतल्यानंतर रिषभनं परिपक्व खेळ करताना समाधानकारक पल्ला गाठून दिला. त्यानं १३९ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह नाबाद १०० धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेत शतक झळकावणारा तो पहिला आशिआई यष्टिरक्षक-फलंदाज ठरला. त्यानं महेंद्रसिंग धोनीचा २०१०साली नोंदवलेलाही विक्रम मोडला. रिषभच्या या अविश्वसनीय खेळीनंतर भारतीय गोलंदाजांकडून उल्लेखनीय कामगिरीची अपेक्षा होती, पण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर व किगन पीटरसन चांगले खेळले.
भारताच्या पहिल्या डावातील २२३ धावांच्या प्रत्युत्तरात आफ्रिकेचा पहिला डाव २१० धावांवर गडगडला. जसप्रीत बुमराहनं ५ विकेट्स घेतल्या. भारत दुसऱ्या डावात दमदार खेळ करेल असे वाटले होते, परंतु लोकेश राहुल ( १०), मयांक अग्रवाल ( ७), चेतेश्वर पुजारा ( ९) आणि अजिंक्य रहाणे ( १) हे माघारी परतल्यानं त्यांची अवस्था ४ बाद ५८ अशी झाली. संकटकाळात रिषभ व विराटनं डाव सावरला. पण, लंच ब्रेकनंतर भारताला पाचवा धक्का बसला. १४३ चेंडूंत २९ धावा करणारा विराट कोहली परतला माघारी परतला अन् रिषभ पंतसोबतची ९४ धावांची भागीदारी संपुष्टात आली. विराट बाद धाला तेव्हा ५ बाद १५२ धावा होत्या अन् नंतर भारताची गाडी घसरताना दिसली.
आर अश्विन ( ७), शार्दूल ठाकूर (५) व उमेश यादव (०) हे झटपट माघारी परतले. ८८ धावांवर असताना रिषभला जीवदान मिळालं, महाराजनं झेल सोडला. मोहम्मद शमी बाद झाल्यानंतर रिषभ आक्रमक फटकेबाजी करू लागला. रिषभनं १३१ चेंडूंत शतक पूर्ण केलं. जसप्रीत बुमराह ( २) बाद झाला अन् भारताचा दुसरा डावही आटोपला. भारतानं दुसऱ्या डावात १९८ धावा करताना आफ्रिकेसमोर विजयासाठी २१२ धावांचे लक्ष्य ठेवले. मार्को येनसन ( ४-३८), कागिसो रबाडा ( ३-५३) आणि लुंगी एनगिडी ( ३-२१) यांनी सुरेख कामगिरी केली.
प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या आफ्रिकेला मोहम्मद शमीनं झटका दिला. एडन मार्कराम ( १६) याला शमीनं पुन्हा एकदा बाद करून आफ्रिकेला २३ धावांवर पहिला धक्का दिला. पण, त्यानंतर मात्र कर्णधार डीन एल्गर व किगर पीटरसन यांनी भारतीय गोलंदाजाचा धैर्यानं सामना केला. समोरून भारतीय गोलंदाज आग ओकत असताना यष्टिंमागून रिषभ पंत व विराट कोहली आफ्रिकन गोलंदाजांच एकाग्रता भंग करण्यासाठी सारे प्रयत्न करताना दिसले. दोघंही सुसाट स्लेजिंग करत होते. एल्गरला २२ धावांवर असताना आर अश्विननं LBW केले, परंतु त्यानं DRS घेतला. त्यात चेंडू यष्टिंवरून जात असल्याचे रिप्लेत दिसताच विराटचा पारा चढला... एल्गरला जीवदान मिळाले.
नेमकं काय घडलं?आर अश्विननं टाकलेला चेंडू एल्गरच्या पॅडवर आदळला अन् सर्वांना जोरदार अपील केले. मैदानावरील पंच एराम्सस यांनी लगेच बोट वर केले. मोठी विकेट मिळाली म्हणून भारतीय खेळाडू आनंदात होते. पण, एल्गरनं लगेच DRS घेतला. चेंडू यष्टींवर आदळत असल्याचा विश्वास सर्वांनाच होता, पण रिप्लेत चेंडू स्टम्प्सच्या वरून जाताना दिसला अन् एराम्सस यांना निर्णय बदलावा लागला. त्यावेळेस त्यांनीही हे शक्य नाही अशीच प्रतिक्रिया दिली.
पाहा व्हिडीओ...