Join us  

संजू सॅमसनने पहिले शतक झळकावले, टीकाकारांना बायसेप दाखवले, Video 

India vs South Africa 3rd ODI Live Marathi :  दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या व निर्णायक वन डे सामन्यात भारताला पुन्हा एकदा टॉस जिंकता आला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 7:45 PM

Open in App

India vs South Africa 3rd ODI Live Marathi  (Marathi News)  :  दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या व निर्णायक वन डे सामन्यात भारताला पुन्हा एकदा टॉस जिंकता आला नाही. ऋतुराज गायकवाडच्या दुखापतीमुळे रजत पाटीदारला आज पदार्पणाची संधी मिळाली आणि त्याने १६ चेंडूंत २२ धावांची आक्रमक खेळी केली. मागील दोन सामन्यांत सलग अर्धशतक झळकावणाऱ्या साई सुदर्शनला ( १०) रोखण्यात आज आफ्रिकन गोलंदाज यशस्वी ठरले. संजू सॅमसनला अखेर सूर गवसला आणि त्याने कर्णधार लोकेश राहुलसह ५२ धावांची भागीदारी करून डाव सावरला. लोकेश २१ धावांवर बाद झाला आणि भारताची धावगती संथ करण्यात आफ्रिकेचे खेळाडू यशस्वी ठऱले. कॅलेंडर वर्षात १००० धावा करणारा लोकेश राहुल हा भारताचा दुसरा यष्टिरक्षक-फलंदाज ठरला. १४ वर्षांपूर्वी महेंद्रसिंग धोनीने हा पराक्रम केला होता. संजूने वन डेतील चौथे अर्धशतक झळकावले. त्याला तिलक वर्माने चांगली साथ दिली. या दोघांनी हळुहळू धावांचा वेग वाढवला. या दोघांनी १२८ चेंडूंत शतकी भागीदारी पूर्ण केली. संजूने खेचलेले खणखणीत षटकार पाहण्यासारखे होते. तिलक वर्माने ७५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. ही जोडी तोडण्यासाठी केशव महाराजला गोलंदाजीला आणले आणि तिलक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. त्याने ७७ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ५२ धावा केल्या आणि संजूसोबत १३७ चेंडूंत ११६ धावा जोडल्या. संजूने ११० चेंडूंत वन डेतील त्याचे पहिले शतक झळकावले आणि टीकाकारांना बायसेप दाखवले. 

 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकासंजू सॅमसन