India vs South Africa 3rd ODI Live (Marathi News) : संजू सॅमसनने ( Sanju Samson Century) तिसऱ्या व निर्णायक वन डे सामन्यात शतक झळकावले. मागील दोन सामन्यांत अपयशी ठरलेल्या संजूने वन डेतील पहिले शतक झळकावून टीकाकारांना उत्तर दिले. तिलक वर्मा व लोकेश राहुल यांनी संजूला दमदार साथ दिली आणि दक्षिण आफ्रिकेसमोर तगडे लक्ष्य उभे केले. बोलंड पार्क येथे शतक झळकावणारा संजू तिसरा भारतीय ठरला आहे. २००१ मध्ये केन्याविरुद्ध सचिन तेंडुलकर व सौरव गांगुली यांनी येथेच शतक ठोकले होते. दक्षिण आफ्रिकेत त्यांच्याचविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा संजू विराट कोहलीनंतर दुसरा भारतीय ठरला.
संजू सॅमसनने पहिले शतक झळकावले, टीकाकारांना बायसेप दाखवले, Video
ऋतुराज गायकवाडच्या दुखापतीमुळे रजत पाटीदारला पदार्पणाची संधी मिळाली आणि त्याने १६ चेंडूंत २२ धावांची आक्रमक खेळी केली. साई सुदर्शनला ( १०) आज मोठी खेळी करता आली नाही. संजूला अखेर सूर गवसला आणि त्याने कर्णधार लोकेश राहुलसह ५२ धावांची भागीदारी करून डाव सावरला. लोकेश २१ धावांवर बाद झाला. संजू आणि तिलक वर्मा यांनी हळुहळू धावांचा वेग वाढवला. संजूने खेचलेले खणखणीत षटकार पाहण्यासारखे होते. तिलक वर्माने ७५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.
ही जोडी तोडण्यासाठी केशव महाराजला गोलंदाजीला आणले आणि तिलक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. त्याने ७७ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ५२ धावा केल्या आणि संजूसोबत १३७ चेंडूंत ११६ धावा जोडल्या. संजूने ११० चेंडूंत वन डेतील त्याचे पहिले शतक झळकावले आणि टीकाकारांना बायसेप दाखवले. अखेरच्या ५ षटकांत धावांचा पाऊस पाडण्याच्या प्रयत्नात संजू झेलबाद झाला. त्याने ११४ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने १०८ धावा केल्या.
संजूच्या विकेटनंतर भारताला दोन धक्के बसले. वॉशिंग्टन सुंदर ( १४ ) व अक्षर पटेल( १) मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात बाद झाले. रिंकू सिंग ( २७ चेंडूंत ३८ धावा) व अर्शदीप सिंग ( २ चेंडूंत ७ धावा) यांनी शेवटपर्यंत खेळ करून संघाला ८ बाद २९६ धावांपर्यंत पोहोचवले.
Web Title: IND vs SA 3rd ODI Live Marathi : SANJU SAMSON scored 108 runs from 114 balls with 6 fours and 3 sixes, India post 296/8
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.