IND vs SA, 3rd ODI Live Updates : भारताची ऑस्ट्रेलियाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी; दक्षिण आफ्रिकेवर २-१ अशी विजयी स्वारी

India vs South Africa, 3rd ODI Live Updates : भारतीय गोलंदाजांनी निर्णायक व तिसऱ्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बहारदार कामगिरी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 06:35 PM2022-10-11T18:35:51+5:302022-10-11T18:41:41+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA, 3rd ODI Live Updates : India have defeated South Africa and seal the ODI series by 2-1. | IND vs SA, 3rd ODI Live Updates : भारताची ऑस्ट्रेलियाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी; दक्षिण आफ्रिकेवर २-१ अशी विजयी स्वारी

IND vs SA, 3rd ODI Live Updates : भारताची ऑस्ट्रेलियाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी; दक्षिण आफ्रिकेवर २-१ अशी विजयी स्वारी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs South Africa, 3rd ODI Live Updates : भारतीय गोलंदाजांनी निर्णायक व तिसऱ्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बहारदार कामगिरी केली.  नाणेफेक जिंकून कर्णधार शिखर धवनने घेतलेला गोलंदाजीचा निर्णय मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव व शाहबाज अहमद यांनी सार्थ ठरवला. कुलदीपची हॅटट्रिक हुकली, पण त्याने ४.१-१-१८-४ अशी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यानंतर भारताने ७ विकेट्स राखून हा सामना जिंकला व मालिकाही २-१ अशी खिशात घातली. शुबमन गिलचे अर्धशतक १ धावेने हुकले.  

कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तिसऱ्याच षटकात आफ्रिकेला धक्का बसला. वॉशिंग्टन सुंदरने तिसऱ्या षटकात क्विंटन डी कॉकला ( ६) माघारी पाठवले. मोहम्मद सिराज व आवेश खान यांनी आज प्रभावी गोलंदाजी केली. सिराजने यानेमन मलान ( १५) व रिझा हेंड्रीक्स ( ९) यांना माघारी पाठवले. शाहबाज अहमदने ( Shahbaz Ahmed)  एडन मार्कराम ( ९) याला झेलबाद केले.  वॉशिंग्टनने सामन्यातील दुसरी विकेट घेताना डेव्हिड मिलरला ( ७) त्रिफळाचीत केले. पुढील षटकात कुलदीपने अँडिले फेहलुकवायोचा ( ५) त्रिफळा उडवला.

 हेनरिच क्लासेन आफ्रिकेसाठी खिंड लढवत होता. त्याने ४२ चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने ३४ धावा केल्या आणि शाहबाजने त्याचा त्रिफळा उडवून मोठं यश मिळवले. कुलदीपने सलग दोन चेंडूंत बीजॉर्न फॉर्च्युन ( १) व  एनरिच नॉर्खिया ( ०) यांना बाद केले. लुंगी एनगिडीने भारतीय गोलंदाजाची हॅटट्रिक पूर्ण होऊ दिली नाही. पण, पुढील षटकात कुलदीपने विकेट घेताना आफ्रिकेचा डाव ९९ धावांत गुंडाळला. भारताविरुद्धची ही आफ्रिकेची निचांक कामगिरी ठरली. यापूर्वी १९९९ मध्ये नैरोबी येथे झालेल्या वन डेत त्यांना ११७ धावा करता आल्या होत्या. 

शिखर धवन ( ८) आज पुन्हा अपयशी ठरला, तर इशान किशन आज १० धावा करून माघारी परतला. मात्र, शुबमन व श्रेयस अय्यर यांनी चांगला खेळ करताना भारताचा विजय पक्का केला. शुबमन विजयी चौकार मारून अर्धशतकासह भारताचा विजयही साकारेल असे वाटले होते. पण, ४९ धावांवर एनगिडीने त्याला पायचीत  केले.  श्रेयसने षटकार खेचून भारताचा विजय पक्का केला. भारताने १९.१ षटकांत ३ बाद १०५ धावा करून मोठा विजय मिळवला. श्रेयस २८ धावांवर नाबाद राहिला. 

भारताचा २०२२ कॅलेंडर वर्षातील हा २२ वा विजय ठरला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये कॅलेंडर वर्षात सर्वाधिक विजय मिळवण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या ( २००३) विक्रमाशी भारताने बरोबरी केली. भारताने २०२२ या कॅलेंडर वर्षात २ कसोटी, १३ वन डे व २३ ट्वेंटी-२० सामने जिंकले आहेत. २०१७ मध्ये भारताने ३७ विजय मिळवले होते.
 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: IND vs SA, 3rd ODI Live Updates : India have defeated South Africa and seal the ODI series by 2-1.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.