IND vs SA 3rd ODI Live Updates: भारतीय कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून यजमान दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. आफ्रिकेच्या आजच्या डावाची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. सलामीवीर यानामन मलान तिसऱ्याच षटकात माघारी परतला. दीपक चहरने त्याला बाद केले. त्यानंतर अनुभवी क्विंटन डी कॉकने कर्णधार टेंबा बवुमाच्या साथीने डाव पुढे नेला. पण दीपक चहरच्या गोलंदाजीवरच पुन्हा एकदा आफ्रिकेला धक्का बसला. चहरने टाकलेला चेंडू हळूच टोलवून एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात बवुमा धावचीत झाला. राहुलने अप्रतिम थ्रो करत त्याला माघारी धाडले.
पहिल्या दोन सामन्यात संधी न मिळालेला दीपक चहर तिसऱ्या सामन्यात चमकला. त्याने आफ्रिकेला पहिला धक्का खूप लवकर दिला. त्यानंतर भागीदारी बनण्यास सुरूवात झाल्यानंतर भारताला दिलासा मिळाला. चहरने बवुमाला ऑफ साईडला चेंडू टाकला. तो चेंडू त्याने राहुलच्या दिशेने मारला. चेंडू हळूच मारून एक धाव घ्यायची असा बवुमाचा प्लॅन होता, पण तो फसला. राहुलच्या हातात बॉल गेल्यानंतर त्याने लगेचच लांबून थ्रो स्टंपवर मारला. चेंडू स्टंपला लागला आणि तिसऱ्या पंचांनी रिप्लेमध्ये पाहून बवुमा बाद असल्याचं सांगितलं. पाहा व्हिडीओ-
दरम्यान, भारतीय संघाने पहिले दोन सामने हरले. त्यामुळे तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात चार बदल करण्यात आले. अनुभवी रविचंद्रन अश्विन आणि भुवनेश्वर कुमार यांना संघातून वगळण्यात आले. तसेच, शार्दुल ठाकूर व व्यंकटेश अय्यरलाही बाहेर बसवण्यात आलं. त्यांच्या जागी दीपक चहर, जयंत यादव, सूर्यकुमार यादव आणि प्रसिध कृष्णा या चौघांना संघात स्थान देण्यात आले. भारताने पहिली कसोटी वगळता या दौऱ्यावर एकही सामना जिंकलेला नाही. वन डे मालिकादेखील भारताने आधीच गमावली आहे, त्यामुळे आजचा सामना जिंकून किमान लाज राखावी असा फॅन्सचा सूर आहे.
Web Title: IND vs SA 3rd ODI Live Updates KL Rahul Direct Hit dismisses Africa Captain Temba Bavuma Run Out Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.