IND vs SA 3rd ODI: भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार राहुलने टॉससाठी हजर झाल्यावर संघात करण्यात आलेले बदल सांगितले. पहिल्या दोन सामन्यात भारताचा सहज पराभव झाल्यामुळे तिसऱ्या सामन्यात काही बदल अपेक्षित होते. भारताने तिसऱ्या सामन्यासाठी चार महत्त्वाचे बदल केले. सूर्यकुमार यादवला व्यंकटेश अय्यरच्या जागी, जयंत यादवला रविचंद्रन अश्विनच्या जागी, प्रसिद्ध कृष्णाला भुवनेश्वर कुमारच्या जागी तर दीपक चहरला शार्दुल ठाकूरच्या जागी संघात स्थान देण्यात आले. मात्र, मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला संघात एकाही सामन्यासाठी संधी देण्यात आली नाही. त्यामुळे नेटकऱ्यांचा चांगलाच संताप दिसून आला.
ऋतुराज गायकवाडने सय्यद मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेत धडाकेबाज फलंदाजी केली. त्यामुळेच त्याला आफ्रिका दौऱ्यावर संधी मिळाली. १८ खेळाडूंच्या चमूत तिला संधी देण्यात आली होती. पण तीनपैकी एकाही सामन्यात त्याला अंतिम ११ खेळाडूंमध्ये संधी देण्यात आली नाही. शिखर धवन आणि केएल राहुल हे दोन अनुभवी सलामीवीर असताना ऋतुराजला संधी मिळाली नाही. पण नेटकऱ्यांचा मात्र संताप झाला. अनेकांनी केएल राहुल आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनाच धारेवर धरलं.
पाहा निवडक ट्वीट्स-
--
--
--
--
--
दरम्यान, भारताने या दौऱ्याची सुरूवात दमदार विजयाने केली. पण त्यानंतर भारताला पराभवाचा सामना करावा लागला. आफ्रिकन संघाने कसोटी मालिका पिछाडीवर असताना २-१ने जिंकली. त्यानंतर वन डे मालिकेत भारतीय खेळाडू दमदार खेळ दाखवतील अशी आशा होती. पण साऱ्यांचीच निराशा झाली. दोन्ही सामने आफ्रिकेने सहज जिंकले. त्यामुळे तिसऱ्या सामन्यासाठी संघात बदल करणं क्रमप्राप्त होतं. त्यानुसार संघात चार महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले. पण ऋतुराजला मात्र संघात स्थान मिळाले नाही.