India vs South Africa, 3rd ODI Live Updates : भारतीय संघाने तिसऱ्या वन डे सामन्यात ७ विकेट्स राखून दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळून मालिका २-१ अशी जिंकली. मोहम्मद सिराज ( २-१७), वॉशिंग्टन सुंदर ( २-१५), कुलदीप यादव व शाहबाज अहमद ( २-३२) यांनी उत्तम गोलंदाजी करताना आफ्रिकेला ९९ धावांवर गुंडाळले. कुलदीपने ४.१-१-१८-४ अशी उल्लेखनीय कामगिरी केली. शुबमन गिलने ४९ धावांची केली केली. २०१५मध्ये दक्षिण आफ्रिकेने भारतात वन डे मालिका जिंकली होती, तर २००५मध्ये चार सामन्यांची मालिका बरोबरीत सोडवली होती. १९९२, १९९६, २००० आणि २०१०मध्ये त्यांना मालिकेत पराभव पत्करावा लागला होता. १२ वर्षानंतर भारताने आफ्रिकेविरुद्ध वन डे मालिका जिंकली आणि कर्णधार शिखर धवनने ( Shikhar Dhawan) सेलिब्रेशनही त्याच्या स्टाईलमध्ये केले. या विजयासोबत भारताने आयसीसी वर्ल्ड कप २०२३ सुपर लीगच्या तालिकेत अव्वल स्थान पटकावले.
भारताची ऑस्ट्रेलियाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी; दक्षिण आफ्रिकेवर २-१ अशी विजयी स्वारी
कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. क्विंटन डी कॉक ( ६), यानेमन मलान ( १५), रिझा हेंड्रीक्स ( ९), एडन मार्कराम ( ९), डेव्हिड मिलर ( ७) आणि अँडिले फेहलुकवायो ( ५) अपयशी ठरले. हेनरिच क्लासेन आफ्रिकेसाठी खिंड लढवत होता. त्याने ४२ चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने ३४ धावा. कुलदीपने सलग दोन चेंडूंत बीजॉर्न फॉर्च्युन ( १) व एनरिच नॉर्खिया ( ०) यांना बाद केले. लुंगी एनगिडीने भारतीय गोलंदाजाची हॅटट्रिक पूर्ण होऊ दिली नाही. आफ्रिकेचा डाव ९९ धावांत गुंडाळला. भारताविरुद्धची ही आफ्रिकेची निचांक कामगिरी ठरली. यापूर्वी १९९९ मध्ये नैरोबी येथे झालेल्या वन डेत त्यांना ११७ धावा करता आल्या होत्या.
शिखर धवन ( ८) आज पुन्हा अपयशी ठरला, तर इशान किशन आज १० धावा करून माघारी परतला. मात्र, शुबमन व श्रेयस अय्यर यांनी चांगला खेळ करताना भारताचा विजय पक्का केला. शुबमन ४९ धावांवर बाद झाला. भारताने १९.१ षटकांत ३ बाद १०५ धावा करून मोठा विजय मिळवला. श्रेयस २८ धावांवर नाबाद राहिला. भारताचा २०२२ कॅलेंडर वर्षातील हा ३८ वा विजय ठरला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये कॅलेंडर वर्षात सर्वाधिक विजय मिळवण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या ( २००३) विक्रमाशी भारताने बरोबरी केली. भारताने २०२२ या कॅलेंडर वर्षात २ कसोटी, १३ वन डे व २३ ट्वेंटी-२० सामने जिंकले आहेत. २०१७ मध्ये भारताने ३७ विजय मिळवले होते.
या विजयासह भारतीय संघ आयसीसी वर्ल्ड कप २०२३ सुपर सीरिजच्या तालिकेत १२९ गुणांसह अव्वल स्थान पटकावताना इंग्लंडला ( १२५) मागे टाकले. धवनने विजयाची ट्रॉफी मुकेश कुमारच्या हाती सोपवताना परंपरा कायम राखली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IND vs SA, 3rd ODI Live Updates : Shikhar Dhawan special celebration after lifting the trophy, he hand the trophy to Mukesh Kumar, India the Table Toppers of ICC World Cup Super League Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.