Join us  

IND vs SA, 3rd ODI Live Updates : निर्णायक सामन्यात खोडा, भारत-दक्षिण आफ्रिका तिसऱ्या सामन्याची वेळ बदलली

India vs South Africa, 3rd ODI Live Updates : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाने रांची येथे जबरदस्त कमबॅक केले. इशान किशन व श्रेयस अय्यर यांनी दमदार फलंदाजी करताना भारताला मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवून दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 1:13 PM

Open in App

India vs South Africa, 3rd ODI Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका वन डे मालिकेचा निर्णायक सामना दिल्लीत खेळवला जातोय... पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाने रांची येथे जबरदस्त कमबॅक केले. इशान किशन व श्रेयस अय्यर यांनी दमदार फलंदाजी करताना भारताला मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. त्यामुळे आजचा सामना हा दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. दिल्लीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांची सरासरी धावसंख्या ही २३० इतकी आहे, दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्धच्या मागील पाच वन डे मालिकांमध्ये चार जिंकलेल्या आहेत.  त्यामुळे आजच्या सामन्याची सर्वांनाच उत्सुकता आहे, परंतु सामन्याच्या वेळेतच बदल झालेला पाहायला मिळतोय.

शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दुसऱ्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवताना मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. लोकल बॉय इशान किशनने ( Ishan Kishan) ८४ चेंडूंत ४ चौकार व ७ षटकारांसह ९३ धावा केल्या. इशान व श्रेयस यांनी  १६१ धावांची भागीदारी केली. श्रेयस १११ चेंडूत १५ चौकारांच्या मदतीने ११३ धावांवर नाबाद राहिला. भारताने ४५.५ षटकांत ३ बाद २८२ धावा करून भारताला ७ विकेट्स राखून विजय मिळवून दिला.  

बीसीसीआयने दिलेल्या अपडेट्सनुसार १ वाजता होणारी नाणेफेक आता १.३० वाजता होणार आहे आणि त्यानंतर सामन्याला सुरुवात होईल. दिल्लीत मागील ३-४ दिवस पाऊस पडतोय आणि त्यामुळे खेळपट्टी अजूनही ओली आहे, ती सुकवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. २०१५मध्ये दक्षिण आफ्रिकेने भारतात वन डे मालिका जिंकली होती, तर २००५मध्ये चार सामन्यांची मालिका बरोबरीत सोडवली होती. १९९२, १९९६, २००० आणि २०१०मध्ये त्यांना मालिकेत पराभव पत्करावा लागला होती.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

   

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकादिल्ली
Open in App