भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी-२० सामना सेंच्युरीयन स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार मार्करम याने नाणेफेक जिंकून पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ सलग तिसऱ्या सामन्यात नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा बॅटिंगसाठी मैदानात उतरून टार्गेट सेट करताना दिसेल.
दोन्ही संघात प्रत्येकी एक एक बदल, टीम इंडियाकडून नव्या चेहऱ्याला संधी
दुसऱ्या टी-२० सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आला आहे. भारताकडून रमनदीप सिंग (Ramandeep Singh) याला पदार्पणाची संधी मिळाली आहे. हार्दिक पांड्याने त्याला कॅप दिल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातही एक बदल दिसून येतो.
तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी अशी आहे टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन
संजू सॅमसन (विकेट किपर बॅटर), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती
दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग इलेव्हन
रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, एडन मार्करम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (विकेट किपर बॅटर), डेविड मिलर, मार्को यान्सिन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, लुथो सिप्पाला
मालिका १-१ बरोबरीत
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ४ सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारतीय संघानं विजयी सलामी दिली होती. डरबनचं मैदान मारल्यावर भारतीय संघाला दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या सामन्यातील विजयासह मालिकेत १-१ बरोबरी साधली आहे. उर्वरित दोन सामन्यातील निकालावर ही मालिका कुणाच्या नावे होणार ते ठरणार आहे.
Web Title: IND vs SA 3rd T20I Debutant Ramandeep Singh Receives Team India Cap From Hardik Pandya
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.