Join us  

IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड

टीम इंडियाच्या नावे झाला दक्षिण आफ्रिकेच्या मैदानातील विक्रमी धावसंख्येसह सर्वाधिक शतकाचा खास रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 12:33 AM

Open in App

तिलक वर्माच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघानं सेंच्युरियनच्या मैदानात एका मागून एक विक्रमांची नोंद केली. भारतीय संघानं पहिल्यांदा बॅटिंग करताना निर्धारित २० षटकात ६ बाद २१९ धावा केल्या. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेच्या मैदानात टी-२० क्रिकेटमध्ये उभारलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. याआधी भारतीय संघानं २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या मैदानात २१८ धावा केल्याचा रेकॉर्ड होता.  

अभिषेक शर्माचं अर्धशतक अन् तिलक वर्माचे दमदार शतक

सेंच्युरियनच्या मैदानात रंगलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात तिलक वर्मानं ५६ चेंडूत १०७ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत ८ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. त्याच्याशिवाय अभिषेक शर्मानं ५० धावांचे योगदान दिले. हार्दिक पांड्या १८ धावा आणि रमनदीप सिंग १५ धावा करून बाद झाले.  

२०२४ कॅलेंडर ईयरमध्ये टीम इंडियानं रचला नवा इतिहास 

तिलक वर्मानं झळकावलेल्या शतकासह टीम इंडियाच्या नावेही खास विक्रमाची नोंद झाली. भारतीय संघाकडून यंदाच्या वर्षात आलेले हे पाचवे शतक ठरले. या वर्षात अन्य कोणत्याच संघाकडून टी-२० क्रिकेटमध्ये एवढी शतके पाहायला मिळालेली नाहीत. श्रीलंकन  प्रीमिअर लीगमधील जाफना किंग्स संघातील खेळाडूंनी २०२४ मध्ये ४ शतके झळकावली होती. हा रेकॉर्ड टीम इंडियाने मोडित काढला आहे. भारतीय संघ ५ शतकासह संयुक्तरित्या एका कॅलेंडर ईयरमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा संघ ठरला आहे.

२०२४ मध्ये टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारे संघ 

  • भारत- ५ शतके
  • जाफना किंग्स- ४ शतके
  • राजस्थान रॉयल्स- ३ शतके
  • ऑस्ट्रेलिया- २ शतके
  • कोमिला विक्ट्रोयंस- २ शतके

 

भारतीय संघाकडून २०२४ मध्ये कोणत्या फलंदाजांनी झळकावली आहेत शतके  

  • संजू सॅमसन- २ शतके
  • अभिषेक शर्मा- १ शतक
  • रोहित शर्मा- १ शतक
  • तिलक वर्मा- १ शतक