Join us  

IND vs SA 3rd T20I Live Updates : Deepak Chahar ने वॉर्निंग देऊन सोडले, Mumbai Indiasच्या युवा खेळाडूने मग फटके मारले, Video 

India vs South Afrida 3rd T20I Live Updates : क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock), रिले रोसोवू ( Rilee Rossouw) आणि डेव्हिड मिलर ( David Miller) या डावखुऱ्या फलंदाजांनी आज भारतीय गोलंदाजांचे तीन तेरा वाजवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2022 9:03 PM

Open in App

India vs South Afrida 3rd T20I Live Updates : क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock), रिले रोसोवू ( Rilee Rossouw) आणि डेव्हिड मिलर ( David Miller) या डावखुऱ्या फलंदाजांनी आज भारतीय गोलंदाजांचे तीन तेरा वाजवले. क्विंटनला शून्यावर जीवदान देणे खूप महाग पडले. त्यात मोहम्मद सिराजने दोन झेल टाकून रोसोवूला आणखी खेळण्याची संधी दिली. त्याचा फायदा उचलताना रोसोवूने ट्वेंटी-२०तील त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी केली. २०व्या षटकात फलंदाजीला आलेल्या मिलरने सलग तीन षटकार खेचून आफ्रिकेला ३ बाद २२७ धावांपर्यंत पोहोचवले. या तिघांत युवा फलंदाज त्रिस्तान स्टब्स यानेही खारीचा वाटा उचलला. त्याला बाद करण्याची संधी दीपक चहरला होती, पंरतु त्याने फक्त वॉर्निग देऊन सोडले.

Quinton de Kock ने मिळालेल्या जीवदानाचं सोनं केलं, भारतीय गोलंदाजांना धू धू धुतलं अन् नोंदवला विक्रम

कर्णधार टेम्बा बवुमा ( ३) पुन्हा अपयशी ठरला. क्विंटन व रोसोवू यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८९ धावा जोडल्या. क्विंटनने भारताविरुद्ध ट्वेंटी-२०तील चौथे अर्धशतक झळकावताना कॉलिन मुन्रो व निकोलस पूरन यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.  त्याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त २०१७* धावा करून आफ्रिकेकडून अव्वल स्थान पटकावले. क्विंटन ४३ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह ६८ धावांवर रन आऊट झाला. पुढच्याच चेंडूवर त्रिस्तान स्टब्सचा सोपा झेल दिनेश कार्तिकने टाकला. रोसोवूने ट्वेंटी-२० तील त्याचे पहिले शतक ४८ चेंडूत झळकावले. रोसोवू व स्टब्स ( २३) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४४ चेंडूंत ८७ धावांची भागीदारी केली. 

मागच्या सामन्यातील शतकवीर डेव्हिड मिलरने दुसऱ्याच चेंडूवर उत्तुंग षटकार खेचून चेंडू स्टेडियमबाहेर पाठवला. चहरचा तो चेंडू नो बॉल ठरला. मिलरने फ्री हिटचा चेंडूही षटकार खेचला. पुढच्या चेंडूवर सिराजने झेल टिपला, परंतु त्याचा पाय सीमारेषेला लागल्याने आफ्रिकेला सलग तिसरा षटकार मिळाला. त्या षटकात २४ धावा आल्याने आफ्रिकेच्या ३ बाद २२७ धावा झाल्या. रोसोवू ४८ चेंडूंत ७ चौकार व ८ षटकारांसह १०० धावांवर नाबाद राहिला, तर मिलरने ५ चेंडूंत १९ धावा कुटल्या. 

१६व्या षटकात काय झाले?१६व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर दीपक चहरला आफ्रिकेच्या फलंदाजाला नॉन स्ट्रायकर एंडवर रन आऊट करण्याची संधी होती. नव्या नियमानुसार आता मंकडिंग हे रन आऊट असेल. पण, चहरने आफ्रिकेच्या त्रिस्तान स्टब्सला वॉर्निंग देऊन सोडले. दीपकची ही चूक महागात पडेल असे कुणाच्या स्वप्नातही आले नसेल. स्टब्स आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो.   

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकादीपक चहरमुंबई इंडियन्सक्विन्टन डि कॉक
Open in App