India vs South Afrida 3rd T20I Live Updates : क्विंटन डी कॉकवर शून्यावर बाद करण्याची संधी गमावली अन् दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजानं भारतीय गोलंदाजांची वाट लावली. त्याने आणि रिले रोसोवू यांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई करताना १० षटकांत ९६ धावा उभ्या केल्या. भारताविरुद्ध त्याने ट्वेंटी-२०तील चौथे अर्धशतक झळकावताना कॉलिन मुन्रो व निकोलस पूरन यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्याने आणखी एक मोठा विक्रम नोंदवला.
पहिल्याच चेंडूवर श्रेयस अय्यर चुकला अन् क्विंटन डी कॉकने आनंद लुटला; रोहित नाराज दिसला
रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विराट व लोकेश यांना विश्रांती दिली गेलीय, अर्शदीप सिंगच्या पाठीत दुखत असल्याचे रोहितने सांगितले, परंतु काळजीचं कारण नसल्याचेही तो म्हणाला. श्रेयस अय्यर, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज आज खेळणार आहेत. दीपक चहरच्या पहिल्याच चेंडूवर क्विंटन डी कॉकला रन आऊट करण्याची सोपी संधी गमावली. क्विंटने मिड ऑफच्या दिशेने चेंडू टोलावला अन् धाव घेण्यासाठी पळाला, परंतु नॉन स्ट्राईकवर असलेल्या टेम्बा बवुमाचे त्याकडे लक्षच नव्हते. त्यामुळे क्विंटनला माघारी जावे लागले, भारतीय श्रेयस अय्यरने डायरेक्ट हिट केला असता तर क्विंटन रन आऊट झाला असता, पण तो वाचला.
पुढील षटकात मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर क्विंटनने खणखणीत दोन षटकार खेचले, त्यानंर दीपक चहरला मारलेला षटकार पाहण्यासारखा होता. रोहित गोलंदाजावर नाराज दिसला. पाचव्या षटकात उमेश यादवला गोलंदाजीला आणले आणि त्याने आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाला बाद केले. बवुमाची ( ३) खराब कामगिरी याही सामन्यात कायम राहिली. रोहितने सुरेख झेल टिपला. आफ्रिकने पॉवर प्लेमध्ये १ बाद ४८ धावा केल्या आणि त्यात क्विंटनच्या २६ धावा होत्या. सिराजच्या दुसऱ्या षटकातही आफ्रिकेने १३ धावा चोपल्या. क्विंटन व रिली रोसोवू ही जोडी चांगली खेळली. या दोघांनी ३० चेंडूंत अर्धशतकी टप्पा ओलांडला. मोहम्मद सिराजने आर अश्विनच्या गोलंदाजीवर सीमारेषेवर रोसोवूचा झेल सोडला.
उमेश यादवला खणखणीत षटकार खेचून क्विंटनने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले. त्याने ३३ चेंडूंत फिफ्टी पूर्ण करताना आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त २०१७* धावा करून आफ्रिकेकडून अव्वल स्थान पटकावले. डेव्हिड मिलर २००९ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर गेला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"