IND vs SA 3rd T20I Live Updates : भारतीय खेळाडू आज एकजुटीने खेळले, तिसरा सामना जिंकून मालिकेतील आव्हान कायम राखले!

India vs South Africa 3rd T20I Live Updates : भारताने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून मालिका जीवंत ठेवली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 10:25 PM2022-06-14T22:25:29+5:302022-06-15T13:36:08+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA 3rd T20I Live Updates :  India have defeated South Africa by 48 runs and keeps the series alive | IND vs SA 3rd T20I Live Updates : भारतीय खेळाडू आज एकजुटीने खेळले, तिसरा सामना जिंकून मालिकेतील आव्हान कायम राखले!

IND vs SA 3rd T20I Live Updates : भारतीय खेळाडू आज एकजुटीने खेळले, तिसरा सामना जिंकून मालिकेतील आव्हान कायम राखले!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs South Africa 3rd T20I Live Updates : ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad)  आणि इशान किशन ( Ishan Kishan) यांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर गोलंदाजांनी कमाल केली. भारताने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून मालिका जीवंत ठेवली आहे. भारताने या विजयासह मालिकेतील पिछाडी १-२ अशी कमी केली आहे. युजवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal) ने तीन व हर्षल पटेल ( Harshal Patel) ने चार विकेट्स घेतल्या. ( India vs South Africa 3rd T20I चे संपूर्ण धावफलक पाहण्यासाठी क्लिक करा

ऋतुराज आणि इशान  यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकवाताना पहिल्या विकेटसाठी ९७ धावा जोडल्या. १०व्या षटकात ऋतुराज ३५ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ५७ धावांवर बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यरनेही चांगले फटके मारले, परंतु तो १४ धावांवर माघारी परतला. श्रेयसने इशानसह १८ चेंडूंत ३१ धावा जोडल्या. इशानने ३५ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५४ धावा केल्या. १५व्या षटकात हार्दिक पांड्या १ धावेवर असताना डेव्हिड मिलरने सोपा झेल टाकला.  रॅसी व्हॅन डेर ड्यूसेनने टीम इंडियाचा कर्णधार रिषभ पंतला ४ धावांवर जीवदान दिले. पण, प्रेटोरीयसच्या त्याच षटकात पंत ६ धावांवर बाद झाला. दिनेश कार्तिकही ६ धावांवर माघारी परतला. पांड्याने ३१ धावा करताना भारताची धावसंख्या ५ बाद १७९ धावा अशी पोहोचवली.  


भुवनेश्वर कुमारने पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करताना आफ्रिकेच्या धावसंख्येवर लगाम लावली. त्यात अक्षर पटेलने चौथ्या षटकात आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाला ( ८) बाद केले. कर्णधार रिषभने फिरकी गोलंदाजांचा योग्या वापर करताना आफ्रिकेवर दडपण निर्माण करण्यात यश मिळवले. हर्षल पटेलने आफ्रिकेला दुसऱा धक्का देताना रिझा हेड्रीक्सला ( २३) बाद केले. त्यानंतर युजवेंद्र चहलने कमाल केली. ड्वेन प्रेटोरियस ( २०) व रॅसी व्हॅन डेर ड्यूसेन ( १) यांना चहलने चकवले अन् रिषभ पंतने यष्टिंमागे तितक्याच चपळतेने दोन्ही झेल टिपले. डेव्हिड मिलरही आज अपयशी ठरला अन् हर्षल पटेलने त्याला ३ धावांवर बाद केले. आफ्रिकेचा निम्मा संघ ७१ धावांवर माघारी परतला होता.

 निम्मा संघ माघारी परतल्यानंतर आफ्रिकेचे पुनरागमन करणे अवघडच झाले होते. त्यात चहलने आणखी एक धक्का दिला. त्याने हेनरीक क्लासेनचा ( २९) अडथळा दूर केला. चहलने ४ षटकांत २० धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. हर्षल पटेलनेही तिसरा धक्का देताना कागिसो रबाडाची ( ९) विकेट घेतली. १९व्या षटकात भुवनेश्वर कुमारने विकेट घेतली. हर्षलने चौथी विकेट घेताना  आफ्रिकेचा संपूर्ण संघ १३१ धावांत माघारी पाठवला. भारताने ४८ धावांनी सामना जिंकला. 

Web Title: IND vs SA 3rd T20I Live Updates :  India have defeated South Africa by 48 runs and keeps the series alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.