Join us  

IND vs SA 3rd T20I Live Updates : भारताचा आणखी एक गोलंदाज दुखापतग्रस्त; रोहित शर्माला आज करावे लागले तीन बदल

India vs South Afrida 3rd T20I Live Updates : मालिका आधीच खिशात घातल्यामुळे भारतीय संघ इंदूर येथे होणाऱ्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर प्लेइंग इलेव्हनमध्ये बदलासह उतरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2022 6:37 PM

Open in App

India vs South Afrida 3rd T20I Live Updates : मालिका आधीच खिशात घातल्यामुळे भारतीय संघ इंदूर येथे होणाऱ्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर प्लेइंग इलेव्हनमध्ये बदलासह उतरला. गुवाहाटीत विजय मिळवून भारतीय संघाने प्रथमच घरच्या मैदानावर आफ्रिकेविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका जिंकल्याचा पराक्रम केला. आज त्यांचे लक्ष्य क्लिन स्वीपवर आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारताचा हा अखेरचा ट्वेंटी-२० सामना असल्याने विजयी शेवट करण्याचा रोहित शर्मा अँड कंपनीचा प्रयत्न असणार आहे.

आजच्या सामन्यात विराट कोहली व लोकेश राहुल यांना विश्रांती दिल्याने रिषभ पंत सलामीला येण्याची आणि श्रेयस अय्यर मधल्या फळीत खेळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजचा समावेश करण्यात आला, परंतु तो आज प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा कमावतो का याची उत्सुकता होती. २०२१ च्या वर्ल्ड कपनंतर भारतीय संघाने फलंदाजीत  कमालीची सुधारणा केलेली दिसतेय, डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजांना काम करण्याची अजूनही गरज आहे. भारताने मागील वर्ल्ड कपनंतर १५ वेळा ट्वेंटी-२०त १८०+ धावा केल्या, तर ४ वेळा १८० पर्यंत मजल मारली.

पाच वर्षांपूर्वी जेव्हा भारतीय संघ इंदूर येथे खेळला होता, तेव्हा रोहितने श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई करताना ट्वेंटी-२०तील पहिले शतक झळकावले होते. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. विराट व लोकेश यांना विश्रांती दिली गेलीय, अर्शदीप सिंग याला आराम दिला गेलाय. त्याच्या पाठीत दुखत असल्याचे रोहितने सांगितले, परंतु काळजीचं कारण नसल्याचेही तो म्हणाला. श्रेयस अय्यर, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज आज खेळणार आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकारिषभ पंतरोहित शर्माश्रेयस अय्यर
Open in App