Join us  

IND vs SA 3rd T20I Live Updates : १० चेंडूंत ४८ धावा! 'डेंजर' क्विंटन डी कॉकला बाद करून श्रेयस अय्यरने चूक सुधारली, Video

India vs South Afrida 3rd T20I Live Updates : जीवदान मिळाल्यानंतर क्विंटन डी कॉकने ( Quinton de Kock) भारतीय गोलंदाजांची धुलाई करताना आफ्रिकेकडून ट्वेंटी-२०त सर्वाधिक धावांचा विक्रम नावावर केला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2022 8:17 PM

Open in App

India vs South Afrida 3rd T20I Live Updates : जीवदान मिळाल्यानंतर क्विंटन डी कॉकने ( Quinton de Kock) भारतीय गोलंदाजांची धुलाई करताना आफ्रिकेकडून ट्वेंटी-२०त सर्वाधिक धावांचा विक्रम नावावर केला. श्रेयस अय्यरने डावाच्या पहिल्याच चेंडूवर त्याला रन आऊट करण्याची सोपी संधी गमावली होती. त्यानंतर क्विंटनने रिली रोसोवूसह ८९ धावा चोपून भारतीय गोलंदाजांना हतबल केले. मात्र, श्रेयसने चूक सुधारली अन् १३ व्या षटकात क्विंटनची विकेट मिळवून दिली. 

Quinton de Kock ने मिळालेल्या जीवदानाचं सोनं केलं, भारतीय गोलंदाजांना धू धू धुतलं अन् नोंदवला विक्रम

क्विंटन डी कॉकवर शून्यावर बाद करण्याची संधी गमावली अन् दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजानं भारतीय गोलंदाजांची वाट लावली. त्याने आणि रिले रोसोवू यांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई करताना १० षटकांत ९६ धावा उभ्या केल्या. भारताविरुद्ध त्याने ट्वेंटी-२०तील चौथे अर्धशतक झळकावताना कॉलिन मुन्रो व निकोलस पूरन यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्याने आणखी एक मोठा विक्रम नोंदवला. कर्णधार टेम्बा बवुमाला ( ३) उमेश यादवच्या गोलंदाजीवर बाद झाला. मोहम्मद सिराजच्या दुसऱ्या षटकातही आफ्रिकेने १३ धावा चोपल्या. क्विंटन व रिली रोसोवू ही जोडी चांगली खेळली. या दोघांनी ३० चेंडूंत अर्धशतकी टप्पा ओलांडला. मोहम्मद सिराजने आर अश्विनच्या गोलंदाजीवर सीमारेषेवर रोसोवूचा झेल सोडला.

उमेश यादवला खणखणीत षटकार खेचून क्विंटनने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले. त्याने ३३ चेंडूंत फिफ्टी पूर्ण करताना आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त २०१७* धावा करून आफ्रिकेकडून अव्वल स्थान पटकावले. डेव्हिड मिलर २००९ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर गेला. अश्विनने त्याच्या ४ षटकांत ३५ धावा दिल्या. पहिल्या चेंडूवर झालेल्या चुकीची श्रेयस अय्यरने भरपाई केली. त्याने चपळ क्षेत्ररक्षण करून क्विंटनला रन आऊट केले. क्विंटनने ४३ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह ६८ धावा केल्या आणि रोसोवूसह ४७ चेंडूंत ८९ धावांची भागीदारी केली.    पुढच्याच चेंडूवर त्रिस्तान स्टब्सचा सोपा झेल दिनेश कार्तिकने टाकला. त्याच स्टब्सने पुढे येत उत्तुंग षटकार खेचला अन् चेंडू स्टेडियमच्या दुसऱ्या माळ्यावर जाऊन पडला. त्यानंतर अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर षटकार खेचून रोसोवूने २७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाक्विन्टन डि कॉकश्रेयस अय्यररिषभ पंत
Open in App