IND vs SA 3rd T20I Live Updates : दक्षिण आफ्रिकेची टॉस जिंकण्याची हॅटट्रिक; रिषभ पंतने करो वा मरो सामन्यात बघा कोणता संघ उतरवला!

India vs South Africa 3rd T20I Live Updates : रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला सलग दोन ट्वेंटी-२० सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 06:44 PM2022-06-14T18:44:32+5:302022-06-14T18:57:57+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA 3rd T20I Live Updates : South Africa won the toss and elected to bowl first against India in the third T20I, both team unchanged  | IND vs SA 3rd T20I Live Updates : दक्षिण आफ्रिकेची टॉस जिंकण्याची हॅटट्रिक; रिषभ पंतने करो वा मरो सामन्यात बघा कोणता संघ उतरवला!

IND vs SA 3rd T20I Live Updates : दक्षिण आफ्रिकेची टॉस जिंकण्याची हॅटट्रिक; रिषभ पंतने करो वा मरो सामन्यात बघा कोणता संघ उतरवला!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs South Africa 3rd T20I Live Updates : रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला सलग दोन ट्वेंटी-२० सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. दक्षिण आफ्रिकेने पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे आणि आजचा सामना जिंकून मालिका विजयाचा त्यांचा निर्धार आहे. भारतासाठी आजचा सामना करो वा मरो असाच आहे. त्यामुळे काही बदलांसह भारतीय संघ मैदानावर आफ्रिकेला टक्कर देण्यासाठी तयार आहे. Vizag भारताने १३ पैकी १० सामने जिंकले आहेत. नाणेफेकीचा कौल पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाच्या बाजूने लागला आणि त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 

  • भारतीय संघाला १९९८-२००० या कालावधीत ऑस्ट्रेलियाकडून सलग १० सामन्यांत पराभव पत्करावा लागला होता.
  • १९७४-७७ या कालावधीत भारतीय संघ इंग्लंडकडून सलग ९ सामन्यांत पराभूत झाला होता
  • १९९५-९६ या कालावधीत दक्षिण आफ्रिकेने सलग ७ सामन्यांत भारताला पराभूत केले आहे.  
  • २०२१-२२मध्ये दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत सलग ७ सामन्यांत टीम इंडियाला हरवले आहे. 
  • १९९९-२००० या कालावधीत भारताने १० सामने गमावले आणि त्यात मोहम्मद अझरुद्दीन, अजय जडेजा, सचिन तेंडुलकर हे कर्णधार होते आणि सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताने ही पराभवाची मालिका खंडीत केली.   
  • भुवनेश्वर कुमारने ट्वेंटी-२०त पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक ३३ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांत सॅम्युएल बद्री व  टीम साऊदी यांच्यासोबत संयुक्तपणे अव्वल स्थान पटकावले आहे. आज त्याला हा विक्रम मोडण्याची संधी आहे. 

तिसऱ्या सामन्यात भारतीय संघात बदलाची अपेक्षा होती, परंतु कर्णधार रिषभ पंतने संघात कोणताच बदल केलेला नाही. आफ्रिकेनेही तोच संघ कायम राखला आहे. 

भारत - ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल ( India: 1 Ruturaj Gaikwad, 2 Ishan Kishan, 3 Shreyas Iyer, 4 Rishabh Pant (capt & wk), 5 Hardik Pandya, 6 Dinesh Karthik, 7 Axar Patel, 8 Harshal Patel, 9 Avesh Khan, 10 Bhuvneshwar Kumar, 11 Yuzvendra Chahal.)

दक्षिण आफ्रिका - रिझा हेड्रीक्स, टेम्बा बवुमा, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, डेव्हिड मिलर, हेनरीच क्लासेन, ड्वेन प्रेटोरियस, वेन पार्नेल, कागिसो रबाडा, केशव महाराज,   एनरिच नॉर्खिया, तब्रेझ शम्सी ( South Africa: 1 Reeza Hendricks, 2 Temba Bavuma (capt), 3 Rassie van der Dussen, 4 David Miller, 5 Heinrich Klaasen (wk), 6 Dwaine Pretorius, 7 Wayne Parnell, 8 Kagiso Rabada, 9 Keshav Maharaj, 10 Anrich Nortje, 11 Tabraiz Shamsi.)

Web Title: IND vs SA 3rd T20I Live Updates : South Africa won the toss and elected to bowl first against India in the third T20I, both team unchanged 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.