Join us  

IND vs SA, 3rd Test Live Updates : जसप्रीत बुमराहनं घेतल्या पाच विकेट्स, दक्षिण आफ्रिकेला मिळवू दिली नाही आघाडी  

India vs South Africa, 3rd Test Day 2 Live Updates : जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah), मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांनी टीम इंडियाला तिसऱ्या कसोटीत कमबॅक करून दिले. शमीच्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 8:08 PM

Open in App

India vs South Africa, 3rd Test Day 2 Live Updates : जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah), मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांनी टीम इंडियाला तिसऱ्या कसोटीत कमबॅक करून दिले. शमीच्या एका षटकानं खऱ्या अर्थानं सामना फिरवला अन् त्यानंतर बुमराहनं प्रहार केला. भारताच्या पहिल्या डावातील २२३ धावांच्या प्रत्युत्तरात आफ्रिकेला आघाडी घेण्यात अपयश आलं. बुमराहनं पाच विकेट्स घेतल्या.  

विराट कोहलीच्या ७९ आणि चेतेश्वर पुजाराच्या ४३ धावांच्या जोरावर भारतानं पहिल्या डावात २२३ धावा केल्या. कागिसो रबाडा व मार्को जॅन्सेन यांनी अनुक्रमे ४ व ३ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात जसप्रीत बुमराहनं आफ्रिकेच्या दोन्ही सलामीवीरांना १७ धावांवर माघारी पाठवले. उमेश यादवनं तिसरा धक्का देताना केशव महाराजला ( २५) त्रिफळाचीत केले. पण, किगन पीटरसन खेळपट्टीवर शड्डू ठोकून बसला. सुरुवातीला त्यानं रॅसी व्हॅन डेर ड्युसेनसह ११४ चेंडूंत ६७ धावांची भागीदारी केली आणि त्यानंतर टेम्बा ववुमासह ९७ चेंडूंत ४२ धावा केल्या. यादरम्यान  पीटरसननं या मालिकेतील त्याचे दुसरे अर्धशतक पूर्ण केले. उमेश यादवनं ड्युसेनला ( २१) बाद केले.

पीटरसन व ववुमा ही जोडी भारताला डोईजड झाली होती आणि तेव्हा विराटनं मोहम्मद शमीला पाचारण केले. ५६ षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर शमीनं बवुमाला ( २८) झेलबाद केले. विराटनं स्लिपमध्ये अप्रतिम झेल टिपला आणि त्यानं अनोखं शतक पूर्ण केलं. कसोटी क्रिकेटमधील हा त्याचा १००वा झेल ठरला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर कायले वेरेयने (  ०) रिषभ पंतच्या हाती झेल देऊन माघारी परतला. आफ्रिकेची अवस्था ६ बाद १५९ अशी झाली होती.  बुमराहनं आफ्रिकेला ७वा धक्का दिला आणि जॅन्सेनला ७ धावांवर माघारी पाठवले. टी ब्रेकपर्यंत आफ्रिकेच्या ७ बाद १७६ धावा झाल्या होत्या. ब्रेकनंतर बुमराहनं आफ्रिकेला मोठा धक्का दिला. १६६ चेंडूंत ९ चौकारांसह ७२ धावा करणाऱ्या पीटरसनला त्यानं बाद केलं. 

कागिसो रबाडा आणि ड्युआने ऑलिव्हर यांनी ९व्या विकेटसाठी महत्त्वाच्या २१ धावा जोडून आफ्रिकेला दोनशेपार नेले. बुमराहनं आफ्रिकेला अखेरचा धक्का देताना त्यांचा पहिला डाव २१० धावांवर गुंडाळला. बुमराहनं या सामन्यात पाच विकेट्स घेतल्या. 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाजसप्रित बुमराहमोहम्मद शामी
Open in App