IND vs SA, 3rd Test Live Updates : जसप्रीत बुमराहची 'पंगा' मार्को जॅन्सेनला महागात पडला; भन्नाट चेंडू टाकून उडवला दांडा, Video 

India vs South Africa, 3rd Test Day 2 Live Updates : विरोधकांना कसं गपगार करायचे याची जाण जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) याला चांगलीच आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 07:11 PM2022-01-12T19:11:04+5:302022-01-12T19:14:11+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA, 3rd Test Day 2 Live Updates : Jasprit Bumrah making the stumps fly, marco jansen cleen bowled, watch video  | IND vs SA, 3rd Test Live Updates : जसप्रीत बुमराहची 'पंगा' मार्को जॅन्सेनला महागात पडला; भन्नाट चेंडू टाकून उडवला दांडा, Video 

IND vs SA, 3rd Test Live Updates : जसप्रीत बुमराहची 'पंगा' मार्को जॅन्सेनला महागात पडला; भन्नाट चेंडू टाकून उडवला दांडा, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs South Africa, 3rd Test Day 2 Live Updates : विरोधकांना कसं गपगार करायचे याची जाण जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) याला चांगलीच आहे. विकेट मिळवण्यात अपयशी ठरत असलेल्या बुमराहवर टीका झाली आणि आज त्यानं कामगिरीतून सर्वांची बोलती बंद केली. त्यात दुसऱ्या कसोटीत  दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज मार्को जॅन्सेन यानं घेतलेल्या पंग्याची परतफेडही त्यानं आज केली. जोहान्सबर्ग कसोटीत बुमराह फलंदाजी करत असताना जॅन्सेननं बाऊन्सर मारून त्याचा खांदा जखमी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. आज जॅन्सेन फलंदाजीला होता अन् बुमराहच्या हाती चेंडू होता. त्यानं बाऊन्सर मारून जॅन्सेनला जखमी करण्याएवजी भन्नाट चेंडू टाकून त्रिफळा उडवला. या विकेटनंतर त्यानं काहीच सेलिब्रेशन केलं नाही फक्त तीक्ष्ण नजरेनं तो  जॅन्सेनकडे पाहत राहिला.

विराट कोहलीच्या ७९ आणि चेतेश्वर पुजाराच्या ४३ धावांच्या जोरावर भारतानं पहिल्या डावात २२३ धावा केल्या. कागिसो रबाडा व मार्को जॅन्सेन यांनी अनुक्रमे ४ व ३ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात जसप्रीत बुमराहनं आफ्रिकेच्या दोन्ही सलामीवीरांना १७ धावांवर माघारी पाठवले. उमेश यादवनं तिसरा धक्का देताना केशव महाराजला ( २५) त्रिफळाचीत केले. पण, किगन पीटरसन खेळपट्टीवर शड्डू ठोकून बसला. सुरुवातीला त्यानं रॅसी व्हॅन डेर ड्युसेनसह ११४ चेंडूंत ६७ धावांची भागीदारी केली आणि त्यानंतर टेम्बा ववुमासह ९७ चेंडूंत ४२ धावा केल्या. यादरम्यान  पीटरसननं या मालिकेतील त्याचे दुसरे अर्धशतक पूर्ण केले. उमेश यादवनं ड्युसेनला ( २१) बाद केले.

पीटरसन व ववुमा ही जोडी भारताला डोईजड झाली होती आणि तेव्हा विराटनं मोहम्मद शमीला पाचारण केले. ५६ षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर शमीनं बवुमाला ( २८) झेलबाद केले. विराटनं स्लिपमध्ये अप्रतिम झेल टिपला आणि त्यानं अनोखं शतक पूर्ण केलं. कसोटी क्रिकेटमधील हा त्याचा १००वा झेल ठरला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर कायले वेरेयने (  ०) रिषभ पंतच्या हाती झेल देऊन माघारी परतला. आफ्रिकेची अवस्था ६ बाद १५९ अशी झाली होती.  बुमराहनं आफ्रिकेला ७वा धक्का दिला आणि जॅन्सेनला ७ धावांवर माघारी पाठवले. टी ब्रेकपर्यंत आफ्रिकेच्या ७ बाद १७६ धावा झाल्या होत्या. ब्रेकनंतर बुमराहनं आफ्रिकेला मोठा धक्का दिला. १६६ चेंडूंत ९ चौकारांसह ७२ धावा करणाऱ्या पीटरसनला त्यानं बाद केलं. 



Web Title: IND vs SA, 3rd Test Day 2 Live Updates : Jasprit Bumrah making the stumps fly, marco jansen cleen bowled, watch video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.