India vs South Africa, 3rd Test Day 2 Live Updates : मोहम्मद शमीनं एका षटकात दक्षिण आफ्रिकेच्या दोन फलंदाजांना माघारी पाठवून टीम इंडियाला सामन्यात कमबॅक करून दिले. त्यानंतर जसप्रीत बुमराहनं आफ्रिकेचे धाबे दणाणून सोडले. दक्षिण आफ्रिकेनं जोहान्सबर्ग कसोटी जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणल्यानंतर तिसऱ्या कसोटीत दोन्ही संघ मालिका विजयासाठी कंबर कसून मैदानावर उतरले आहेत. पण, जोहान्सबर्ग कसोटीत भारतीय संघात ज्या आक्रमकतेचा अभाव जाणवला ती विराट कोहलीच्या पुनरागमनासोबतच आली. यावेळी विराटनं डग आऊटमध्ये बसलेल्या सहकाऱ्यांनाही कामाला लावलं...
पहिल्या डावात २२३ धावा होऊनही विराटच्या आक्रमकतेत तसूभरही कमी दिसली नाही. यष्टींमागून तो आफ्रिकेच्या फलंदाजांना डिवचण्याचं ( स्लेजिंग) काम करत होता. त्यामुळे गोलंदाजांचा उत्साहही वाढताना दिसला. भारताच्या २२३ धावांत विराट कोहलीनं ७९ आणि चेतेश्वर पुजारानं ४३ धावांचे योगदान दिलं. ५०वी कसोटी खेळणाऱ्या कागिसो रबाडानं चार विकेट्स घेतल्या, तर मार्को जॅन्सेननं तीन बळी टिपले.
प्रत्युत्तरात आफ्रिका ४ बाद १५९ अशा कमांडिग स्थितीत होते. परंतु मोहम्मद शमीनं एका षटकात टेम्बा बवुमा आणि कायले वेरेयनेला बाद करून सामना फिरवला. यानंतर विराटनं डग आऊटमध्ये बसलेल्या सहकाऱ्यांना खेळाडूंना चिअर करण्यास सांगितले. Keep clapping boys ,असे तो सहकाऱ्यांना सांगत होता आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पाहा व्हिडीओ...
Web Title: IND vs SA, 3rd Test Day 2 Live Updates : 'Keep clapping boys' Virat Kohli asks dugout to clap loudly to support the team, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.