Join us

IND vs SA, 3rd Test Live Updates : दुसऱ्याच चेंडूवर जसप्रीत बुमराहनं त्रिफळा उडवला, आफ्रिकेच्या धर्तीवर मोठा पराक्रम केला, Video 

India vs South Africa, 3rd Test Day 2 Live Updates : दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्याच चेंडूवर विकेट... यापेक्षा दमदार सुरुवात भारतासाठी काही असूच शकत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 14:23 IST

Open in App

India vs South Africa, 3rd Test Day 2 Live Updates : दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्याच चेंडूवर विकेट... यापेक्षा दमदार सुरुवात भारतासाठी काही असूच शकत नाही. टीम इंडियाच्या पहिल्या डावातील २२३ धावांच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचे दोन्ही सलामीवीर १७ धावांवर माघारी परतले. पहिल्या दिवसअखेरीत आफ्रिकन कर्णधार एडन मार्कराम बाद झाला अन् आज दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच षटकात मार्करामचा त्रिफळा उडाला. बुमराहनं टाकलेल्या चेंडूचा अंदाज बांधण्यास मार्कराम फसला अन् त्यानं चेंडू सोडला व तो थेट यष्टिंवर आदळला. 

केपटाऊन कसोटीच्या पहिल्या दिवशी विराट कोहलीच्या खेळीनं सर्वांचे मन जिंकले. जोहान्सबर्ग कसोटीत कंबरेला उसण भरल्यामुळे माघार घेणाऱ्या विराटनं तिसऱ्या कसोटीत दमदार पुनरागमन केले. शतकानं पुन्हा एकदा त्याला हुलकावणी दिली असली तरी त्याच्या ७९ धावांच्या खेळीनं टीकाकारांनाही जिंकले. बाहेरच्या चेंडूवर फटका मारण्याचा मोह त्यानं कटाक्षानं टाळला होता आणि कालच्या त्याच्या खेळीत कमालीची एकाग्रता दिसली. त्यानं दक्षिण आफ्रिकेत कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये सचिन तेंडुलकरनंतर दुसरे स्थान पटकावले. त्याला चेतेश्वर पुजारानं ४३ धावा करताना उत्तम साथ दिली. अजिंक्य रहाणे, रिषभ पंत यांनी पुन्हा निराश केले. भारताचा पहिला डाव २२३ धावांवर गडगडला. कागिसो रबाडा व मार्को जॅन्सेन यांनी अनुक्रमे ४ व ३ विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरात पहिल्या दिवसात जसप्रीत बुमराहनं आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर याची विकेट घेतली आणि दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्याच षटकात त्यानं आफ्रिकेला आणखी एक धक्का दिला. एडन मार्करामचा त्रिफळा उडवून बुमराहनं आफ्रिकेची अवस्था २ बाद १७ अशी केली. या विकेटसह जसप्रीतनं दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या जलदगती भारतीय गोलंदाजांत पाचवे स्थान पटकावले. त्यानं आशिष नेहरा व वेंकटेश प्रसाद ( ३० विकेट्स) यांचा विक्रम मोडला. या विक्रमात जवागल श्रीनाथ ( ७६), झहीर खान ( ६३), मोहम्मद शमी ( ४१), श्रीनाथ ( ३५ ) व जसप्रीत ( ३१*) हे आघाडीवर आहेत.   

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाजसप्रित बुमराहआशिष नेहरा
Open in App