Join us  

IND vs SA, 3rd Test Live Updates : मोहम्मद शमीच्या एका षटकानं आफ्रिकेला दाखवले तारे; विराट कोहलीनं साजरे केले शतक 'न्यारे'!

India vs South Africa, 3rd Test Day 2 Live Updates : दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्याच चेंडूवर विकेट घेऊन जसप्रीत बुमराहनं भारताला चांगली सुरुवात करून दिली, परंतु दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांकडून चोख प्रत्युत्तर मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 6:33 PM

Open in App

India vs South Africa, 3rd Test Day 2 Live Updates : दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्याच चेंडूवर विकेट घेऊन जसप्रीत बुमराहनं भारताला चांगली सुरुवात करून दिली, परंतु दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांकडून चोख प्रत्युत्तर मिळाले. नाईट वॉचमन म्हणून आलेला केशव महाराज, किगन पीटरस, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन आणि टेम्बा बवुमा यांनी चांगला खेळ करताना आफ्रिकेला दीडशेपार पल्ला पार करून दिला. आफ्रिकेची वाटचाल मोठ्या आघाडीकडे होईल असे वाटत असताना मोहम्मद शमीच्या एका षटकानं त्यांना तारे दाखवले. याच षटकात विराट कोहलीनं अनोखं शतक पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो भारताचा सहावा ( यष्टिरक्षक वगळून) खेळाडू ठरला.

जोहान्सबर्ग कसोटीत कंबरेला उसण भरल्यामुळे माघार घेणाऱ्या विराटनं तिसऱ्या कसोटीत दमदार पुनरागमन केले. शतकानं पुन्हा एकदा त्याला हुलकावणी दिली असली तरी त्याच्या ७९ धावांच्या खेळीनं टीकाकारांनाही जिंकले. त्यानं  दक्षिण आफ्रिकेत कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये सचिन तेंडुलकरनंतर दुसरे स्थान पटकावले. त्याला चेतेश्वर पुजारानं ४३ धावा करताना उत्तम साथ दिली. अजिंक्य रहाणे, रिषभ पंत यांनी पुन्हा निराश केले. भारताचा पहिला डाव २२३ धावांवर गडगडला. कागिसो रबाडा व मार्को जॅन्सेन यांनी अनुक्रमे ४ व ३ विकेट्स घेतल्या.

भारताच्या २२३ धावांच्या प्रत्युत्तरात पहिल्या दिवसात जसप्रीत बुमराहनं आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर याची विकेट घेतली आणि दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्याच षटकात त्यानं आफ्रिकेला आणखी एक धक्का दिला. एडन मार्करामचा त्रिफळा उडवून बुमराहनं आफ्रिकेची अवस्था २ बाद १७ अशी केली. उमेश यादवनं तिसरा धक्का देताना केशव महाराजला ( २५) त्रिफळाचीत केले. पण, किगन पीटरसन खेळपट्टीवर शड्डू ठोकून बसला. सुरुवातीला त्यानं रॅसी व्हॅन डेर ड्युसेनसह ११४ चेंडूंत ६७ धावांची भागीदारी केली आणि त्यानंतर टेम्बा ववुमासह ९७ चेंडूंत ४२ धावा केल्या. यादरम्यान  पीटरसननं या मालिकेतील त्याचे दुसरे अर्धशतक पूर्ण केले. उमेश यादवनं ड्युसेनला ( २१) बाद केले.

पीटरसन व ववुमा ही जोडी भारताला डोईजड झाली होती आणि तेव्हा विराटनं मोहम्मद शमीला पाचारण केले. ५६ षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर शमीनं बवुमाला ( २८) झेलबाद केले. विराटनं स्लिपमध्ये अप्रतिम झेल टिपला आणि त्यानं अनोखं शतक पूर्ण केलं. कसोटी क्रिकेटमधील हा त्याचा १००वा झेल ठरला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर कायले वेरेयने (  ०) रिषभ पंतच्या हाती झेल देऊन माघारी परतला. आफ्रिकेची अवस्था ६ बाद १५९ अशी झाली होती. 

कसोटीत भारताकडून सर्वाधिक झेल घेणारे खेळाडू २०९- राहुल द्रविड१३५ - व्हीव्हीएस लक्ष्मण११५ - सचिन तेंडुलकर१०८ - सुनील गावस्कर १०५ - मोहम्मद अझरूद्दीन१००* - विराट कोहली९९* - अजिंक्य रहाणे 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकामोहम्मद शामीविराट कोहली
Open in App