Virat Kohli on DRS, IND vs SA, 3rd Test Live Updates : Out or not out?, पुन्हा DRS चा ड्रामा!; विराट कोहलीसह राहुल द्रविडलाही विश्वास बसेना 

India vs South Africa, 3rd Test Day 4 Live Updates : रिषभ पंतच्या नाबाद शतकानंतर भारतीय संघानं तिसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २१२ धावांचे आव्हान ठेवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 03:00 PM2022-01-14T15:00:11+5:302022-01-14T15:00:40+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA, 3rd Test Day 4 Live Updates : Out or not out?, Virat Kohli couldn't believe as yet another close call DRS goes against India | Virat Kohli on DRS, IND vs SA, 3rd Test Live Updates : Out or not out?, पुन्हा DRS चा ड्रामा!; विराट कोहलीसह राहुल द्रविडलाही विश्वास बसेना 

Virat Kohli on DRS, IND vs SA, 3rd Test Live Updates : Out or not out?, पुन्हा DRS चा ड्रामा!; विराट कोहलीसह राहुल द्रविडलाही विश्वास बसेना 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs South Africa, 3rd Test Day 4 Live Updates : रिषभ पंतच्या नाबाद शतकानंतर भारतीय संघानं तिसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २१२ धावांचे आव्हान ठेवले. पण, दक्षिण आफ्रिकेकडून तिसऱ्या दिवसात जोरदार प्रत्युत्तर मिळाले. कर्णधार डीन एल्गर व किगन पीटरसन यांनी दमदार कामगिरी करताना संघाला शतकी पल्ला पार करून दिला. एल्गरची विकेट मिळवण्यात भारतीय संघाला तिसऱ्या दिवसाच्या अखेरच्या षटकात यश आलं असलं तरी पीटरसनच्या रुपानं एक संकट त्यांच्यासमोर उभाच आहे. तिसऱ्या दिवशी DRS वरून वाद झाला अन् विराट कोहलीच्या वागण्याचा क्रिकेट चाहत्यांनी निषेध केला. त्यात चौथ्या दिवशीही DRS चा एक निर्णय विरोधात गेल्यानं  विराटसह टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यानंही आश्चर्य व्यक्त केला.

रिषभ पंतनं तिसऱ्या कसोटीचा तिसरा दिवस गाजवला. ४ बाद ५८ अशा अवस्थेत असलेल्या टीम इंडियाला रिषभ पंत व विराट कोहली या जोडीनं सावरलं. पण, विराट माघारी परतल्यानंतर रिषभनं परिपक्व खेळ करताना समाधानकारक पल्ला गाठून दिला. त्यानं १३९ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह नाबाद १०० धावा केल्या.  रिषभच्या या अविश्वसनीय खेळीनंतर भारतीय गोलंदाजांकडून उल्लेखनीय कामगिरीची अपेक्षा होती, पण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर व किगन पीटरसन चांगले खेळले.   

भारतानं दुसऱ्या डावात १९८ धावा करताना आफ्रिकेसमोर विजयासाठी २१२ धावांचे लक्ष्य ठेवले.  एडन मार्कराम ( १६) याला शमीनं पुन्हा एकदा बाद करून आफ्रिकेला २३ धावांवर पहिला धक्का दिला. पण, त्यानंतर एल्गर  व  पीटरसन यांनी भारतीय गोलंदाजाचा धैर्यानं सामना केला. एल्गरला २२ धावांवर असताना आर अश्विननं LBW केले, परंतु त्यानं DRS घेतला. त्यात चेंडू यष्टिंवरून जात असल्याचे रिप्लेत दिसताच विराटचा पारा चढला... एल्गरला जीवदान मिळाले. पण, त्यानंतर पुढे जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर याच DRS मध्ये एल्गर झेलबाद झाल्याचे स्पष्ट झाले अन् भारताला अखेर त्याची विकेट मिळवण्यात यश आले.  

चौथ्या दिवशी DRS वर पुन्हा एकदा विराट चिडला. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर रॅसी व्हॅन डेर ड्युसन स्ट्राईकवर होता अन् चेंडू त्याच्या बॅट जवळून रिषभ पंतच्या हाती विसावला. कॅचची जोरदार अपील झाली. पण, मैदानावरील अम्पायरनं नाबाद निर्णय दिला. रिषभ पंत लगेच विराटकडे जाऊन DRS घेण्यासाठी विनंती करू लागला, शमी DRS घेण्याच्या पक्षात नव्हता. पण, विराटनं अखेरच्या क्षणाला DRS घेण्याचा निर्णय घेतला. रिप्लेमध्ये चेंडू बॅटच्या नजीकहून जाताना स्निकोमीटरमध्ये कट लागल्याचे दिसत होते, पण त्याचवेळी फलंदाजाची बॅटही मैदानावर आदळली. त्यामुळे तिसऱ्या अम्पायरनं ते गृहीत धरून नाबाद निर्णय दिला. 

Web Title: IND vs SA, 3rd Test Day 4 Live Updates : Out or not out?, Virat Kohli couldn't believe as yet another close call DRS goes against India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.