IND vs SA, 3rd Test Live Updates : विराट कोहली मुलीला शतकाचे बर्थ डे गिफ्ट नाही देऊ शकला, पण दोन वर्षांतील सर्वोत्तम वैयक्तिक खेळी करत आफ्रिकेला भिडला

India vs South Africa, 3rd Test Live Updates : विराट कोहली ( Virat Kohli) आला अन् भारी खेळला.. बाहेर जाणाऱ्या चेंडूवर फटका मारण्याचा मोह आज त्यानं कटाक्षानं टाळला.. त्यामुळेच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 08:35 PM2022-01-11T20:35:30+5:302022-01-11T20:47:24+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA, 3rd Test Live Updates : Virat Kohli gone for 79, the wait for 71st century continues; highest Test scores since his last international century | IND vs SA, 3rd Test Live Updates : विराट कोहली मुलीला शतकाचे बर्थ डे गिफ्ट नाही देऊ शकला, पण दोन वर्षांतील सर्वोत्तम वैयक्तिक खेळी करत आफ्रिकेला भिडला

IND vs SA, 3rd Test Live Updates : विराट कोहली मुलीला शतकाचे बर्थ डे गिफ्ट नाही देऊ शकला, पण दोन वर्षांतील सर्वोत्तम वैयक्तिक खेळी करत आफ्रिकेला भिडला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs South Africa, 3rd Test Live Updates : विराट कोहली ( Virat Kohli) आला अन् भारी खेळला.. बाहेर जाणाऱ्या चेंडूवर फटका मारण्याचा मोह आज त्यानं कटाक्षानं टाळला.. त्यामुळेच आजची त्याची खेळी ही मागील ५-६ वर्षांतील सर्वात आव्हानात्मक खेळी असल्याचे सुनील गावस्कर यांनी समालोचन करताना म्हटले.  विराटनं संयमानं खेळ करून अर्धशतक पूर्ण केले. त्याचा आजचा खेळ पाहून तो शतकाचा दुष्काळ संपवेल असेच वाटत होते, परंतु दुसऱ्या बाजूनं टीम इंडियाचे एकेक फलंदाज माघारी परतत असल्यानं विराटवर दडपण वाढले. त्यातच त्याला पुन्हा शतकापासून दूर रहावे लागले. ७८१ दिवस व ६१ आंतरराष्ट्रीय डावानंतरही विराटची शतकाची पाटी कोरी राहिली. पण, मागील दोन वर्षांतील त्यानं आज सर्वोत्तम वैयक्तिक खेळी केली. 


लोकेश व मयांक यांनी मागील दोन सामन्यांत चांगली कामगिरी केली होती आणि त्यामुळे त्यांच्याकडून आजही अपेक्षा उंचावली होती. पण, १२व्या षटकात दक्षिण आफ्रिकेचा युवा गोलंदाज ड्युआने ऑलिव्हर यानं राहुलला बाद केले. ऑलिव्हरनं टाकलेला चेंडू राहुलच्या बॅटची कड घेत यष्टीरक्षक कायले व्हेरेयनेच्या हाती विसावला. पाठोपाठ मयांकही कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये एडन मार्करामच्या हाती झेल देऊन बाद झाला. राहुल व मयांक यांनी अनुक्रमे १२ व १५ धावा केल्या आणि भारताला ३३ धावांवर दोन धक्के बसले.  
पुजारा व विराट यांनी चांगला खेळ करताना पहिल्या सत्रात भारताला आणखी धक्के बसू दिले नाही. विराटच्या कव्हर ड्राईव्हनं साऱ्यांची वाहवाह मिळवली आहे. पुजारानं ७७ चेंडूंत ७ चौकारांसह ४३ धावा केल्या. अजिंक्य रहाणे पहिल्याच चेंडूवर बाद होणार होता, पण नशीब चांगले म्हणून चेंडू दुसऱ्या स्लिपमधील खेळाडूच्या दूर पडला. पण, त्याचा फार उपयोग झाला नाही. तो ९ धावा करून माघारी परतला. विराटनं रिषभ पंतला मार्गदर्शन करताना संघाचा डोलारा सावरला. रिषभही संयमानं खेळताना दिसला. टी ब्रेकनंतर पाहून घेऊ असं विराट पंतला सांगत होता, परंतु आफ्रिकेच्या गोलंदाजांनी डाव साधला. त्यांनी रणनिती आखून पंतला ( २७) माघारी पाठवले. दरम्यान, विराटनं कसोटी क्रिकेटमधील २८ वे अर्धशतक पूर्ण करताना सॉलिड कमबॅक केले.  

पण, त्याला साथ देण्यात आज आर अश्विन व शार्दूल ठाकूर कमी पडले. अश्विन ( २) मार्को जॅन्सेनच्या गोलंदाजीवर बाद झाला. शार्दूलनं चौकार-षटकार मारून धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला, परंतु केशव महाराजनं त्याला जाळ्यात अडकवले. शार्दूल १२ धावांवर बाद झाल्यानं भारताची अवस्था ७ बाद २०५ अशी झाली होती. त्यानंतर आलेला जसप्रीत बुमराह भोपळा न फोडताच कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर बाद झाला.

विराट कोहलीनं मागील दोन वर्षांतील कसोटी क्रिकेटमधील आज सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीची नोंद केली. त्यानं २०२०मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७४ धावा केल्या होत्या. Virat Kohli’s highest Test scores since his last international century. टीम इंडियासाठी एक बाजूनं खिंड लढवणाऱ्या विराटची विकेटही रबाडाला मिळाली. विराट २०१ चेंडूंत १२ चौकार व १ षटकार खेचून ७९ धावांवर झेलबाद झाला.  त्यानंतर आफ्रिकेनं टीम इंडियाचा पहिला डाव २२३ धावांवर गुंडाळला. कागिसो रबाडानं ४ आणि मार्को जॅन्सेननं ३ विकेट्स घेतल्या. 

Web Title: IND vs SA, 3rd Test Live Updates : Virat Kohli gone for 79, the wait for 71st century continues; highest Test scores since his last international century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.