Join us  

IND vs SA, 3rd Test Live Updates : विराट कोहलीच्या विकेटवरून ड्रामा; आफ्रिकेच्या खेळाडूंचा जल्लोष अन् कॅप्टनची ठसन व विक्रमांचा पाऊस

India vs South Africa, 3rd Test Live Updates : विराट कोहली ( Virat Kohli) आला अन् भारी खेळला.. बाहेर जाणाऱ्या चेंडूवर फटका मारण्याचा मोह आज त्यानं कटाक्षानं टाळला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 7:41 PM

Open in App

India vs South Africa, 3rd Test Live Updates : विराट कोहली ( Virat Kohli) आला अन् भारी खेळला.. बाहेर जाणाऱ्या चेंडूवर फटका मारण्याचा मोह आज त्यानं कटाक्षानं टाळला.. त्यामुळेच आजची त्याची खेळी ही मागील ५-६ वर्षांतील सर्वात आव्हानात्मक खेळी असल्याचे सुनील गावस्कर यांनी समालोचन करताना म्हटले. विराट ४० धावांच्या आत असताना दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी त्याच्यासाठी झेलबादची जोरदार अपील केले. पण, चेंडु बॅटला लागलाच नसल्याचे DRS मध्ये दिसले तेव्हा एका बाजूला विराट आणि समोर आफ्रिकेचा संपूर्ण संघ, हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्यानंतर विराटनं संयमानं खेळ करून अर्धशतक पूर्ण केले.  त्याचे हे कसोटीतील २८ वे अर्धशतक ठरले.  लोकेश व मयांक यांनी मागील दोन सामन्यांत चांगली कामगिरी केली होती आणि त्यामुळे त्यांच्याकडून आजही अपेक्षा उंचावली होती. पण, १२व्या षटकात दक्षिण आफ्रिकेचा युवा गोलंदाज ड्युआने ऑलिव्हर यानं राहुलला बाद केले. ऑलिव्हरनं टाकलेला चेंडू राहुलच्या बॅटची कड घेत यष्टीरक्षक कायले व्हेरेयनेच्या हाती विसावला. पाठोपाठ मयांकही कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये एडन मार्करामच्या हाती झेल देऊन बाद झाला. राहुल व मयांक यांनी अनुक्रमे १२ व १५ धावा केल्या आणि भारताला ३३ धावांवर दोन धक्के बसले. पण, दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिकेत २००+ धावांची भागीदारी करणाऱ्या पहिल्या सलामीवीरांचा मान या जोडीनं पटकावला. 

पुजारा व विराट यांनी चांगला खेळ करताना पहिल्या सत्रात भारताला आणखी धक्के बसू दिले नाही. या दोघांनी लंच ब्रेकपर्यंत ९५ चेंडूंत नाबाद ४२ धावा जोडल्या आहेत. विराटच्या कव्हर ड्राईव्हनं साऱ्यांची वाहवाह मिळवली आहे. दोन वर्षांपासूनचा आंतरराष्ट्रीय शतकाचा दुष्काळ विराट या त्याच्या ९९व्या कसोटी सामन्यात संपवेल असा विश्वास त्याची खेळी पाहून वाटत आहे. भारतानं लंच ब्रेकपर्यंत २ बाद ७५ धावा केल्या होत्या. पण, लंच ब्रेकनंतर पुजारा बाद झाला. त्यानं ७७ चेंडूंत ७ चौकारांसह ४३ धावा केल्या. अजिंक्य रहाणे पहिल्याच चेंडूवर बाद होणार होता, पण नशीब चांगले म्हणून चेंडू दुसऱ्या स्लिपमधील खेळाडूच्या दूर पडला. पण, त्याचा फार उपयोग झाला नाही. तो ९ धावा करून माघारी परतला. विराटनं रिषभ पंतला मार्गदर्शन करताना संघाचा डोलारा सावरला. रिषभही संयमानं खेळताना दिसला. टी ब्रेकनंतर पाहून घेऊ असं विराट पंतला सांगत होता, परंतु आफ्रिकेच्या गोलंदाजांनी डाव साधला. त्यांनी रणनिती आखून पंतला ( २७) माघारी पाठवले. दरम्यान, विराटनं कसोटी क्रिकेटमधील २८ वे अर्धशतक पूर्ण करताना सॉलिड कमबॅक केले.  दक्षिण आफ्रिकेतील ही विराटची पाचवी 50+ धावांची खेळी ठरली. यासह त्यानं सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण व चेतेश्वर पुजारा यांचा ४ वेळा 50+ धावांचा विक्रम मोडला. याही विक्रमात सचिन तेंडुलकर ८ वेळा 50+ धावा करून अव्वल स्थानावर आहे.  कर्णधार म्हणून सर्वाधिक ३ वेळा 50+ धावा करणारा विराट अव्वल भारतीय कर्णधार ठरला. आफ्रिकेत आतापर्यंत कसोटीत मोहम्मद अझरुद्दीन, महेंद्रसिंग धोनी, लोकेश राहुल, सचिन तेंडुलकर या कर्णधारांना प्रत्येकी १ वेळा 50+ धावा करता आल्या आहेत.

विराटनं मोडला द्रविडचा विक्रमदक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये विराटनं ६२४* धावांसह दुसरे स्थान पटकावले आहे. सचिन तेंडुलकर ११६१ धावांसह अव्वल स्थानावर आहे. राहुल द्रविडच्या नावावर ६२४ धावा आहेत. त्यानंतर व्हि व्हि एस लक्ष्मण ( ५६६ ) व सौरव गांगुली ( ५०६ ) यांचा क्रमांक येतो.   

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाविराट कोहलीसौरभ गांगुली
Open in App