India vs South Africa 3rd Test: भन्नाट स्विंग... उमेश यादवने गोलंदाजी करत फलंदाजाची केली दांडी गुल (Video)

उमेश यादवने टाकलेला स्विंग चेंडू फलंदाजाला कळूच शकला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 05:48 PM2022-01-12T17:48:58+5:302022-01-12T17:50:28+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA 3rd Test Super Swing Umesh Yadav clean Bowled Keshav Maharaj watch video | India vs South Africa 3rd Test: भन्नाट स्विंग... उमेश यादवने गोलंदाजी करत फलंदाजाची केली दांडी गुल (Video)

India vs South Africa 3rd Test: भन्नाट स्विंग... उमेश यादवने गोलंदाजी करत फलंदाजाची केली दांडी गुल (Video)

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs South Africa 3rd Test: भारतीय संघाने पहिल्या डावात २२३ धावांपर्यंत मजल मारल्यानंतर आफ्रिकन फलंदाजांनी पहिल्या डावात दुसऱ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत ३ गड्यांच्या मोबदल्यात शतकी मजल मारली. पहिल्या दिवशी भारताचा डाव आटोपल्यानंतर आफ्रिकेनेही कर्णधार एल्गरची विकेट गमावली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी खेळ सुरू होताच जसप्रीत बुमराहने एडन मार्करमला त्रिफळाचीत केलं. काही काळ बुमराह शमी जोडीने चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर गोलंदाजी बदल करताच उमेश यादवने अप्रतिम गोलंदाजी करत सेट झालेल्या फलंदाजांची दांडी गुल केली. 

जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या दोघांनी दुसऱ्या दिवशी चांगली गोलंदाजी केली. पण सुरूवातीच्या १० षटकांनंतर विराटने गोलंदाजीत बदल केला आणि तो डाव यशस्वी झाला. विराटने उमेश यादवला गोलंदाजीची संधी दिली. नाइट वॉचमन म्हणून फलंदाजी करत असलेला केशव महाराज भारतीय गोलंदाजांना चांगलंच झुंजवत होता. पण अखेरीस उमेश यादवने स्विंग गोलंदाजीचा उत्तम नमुना पेश करत केशव महाराजला त्रिफळाचीत केलं. उमेश यादवने उडवलेल्या त्रिफळ्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरलही झाला.

पाहा व्हिडीओ-

केशव महाराज बाद झाल्यानंतर कीगन पीटरसन आणि रॅसी वॅन डर डुसेन या दोघांनी चांगली फलंदाजी केली. त्यांनी संघाचा डाव सावरला. पीटरसनने दमदार अर्धशतकही ठोकलं. पण वॅन डर डुसेन मात्र २६ धावा काढून बाद झाला. उमेश यादवला त्याच्या रूपाने दुसरा बळी मिळाला. पण पीटरसनने मात्र टेम्बा बवुमाच्या साथीने डाव पुढे नेत डाव सावरला.

Web Title: IND vs SA 3rd Test Super Swing Umesh Yadav clean Bowled Keshav Maharaj watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.